बापरे...! Income Tax च्या छाप्यात सापडली तब्बल 100 कोटींचे बेहिशेबी संपत्ती

समाजसेवेच्या नावावर शिक्षण संस्था उभारून प्रचंड धनदांडग्यांनी बक्कळ कमाई केलीय. या शिक्षण संस्था नाही तर बाजार मांडण्यात आल्याची टीकाही होतेय.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 08:50 PM IST

बापरे...! Income Tax च्या छाप्यात सापडली तब्बल 100 कोटींचे बेहिशेबी संपत्ती

बंगळुरू 11 ऑक्टोंबर : आयकर (Income Tax) विभागाला कर्नाटकमध्ये एका उद्योग समुहावर घातलेल्या धाडीत मोठं घबाड हाती लागलंय. हा उद्योगसमुह मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्थाही चालवतोय. अनेक इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजस या उद्योग समुहाकडून चालवले जातात. या छाप्यांमध्ये एकून 100 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आल्याचं Income Tax विभागानं म्हटलं आहे. ही संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे दिपून गेले. अधिकारी या संपत्तीची मोजदाज करत असून रोख पैसे, सोनं आणि अनेक गोष्टी मिळाल्याचंही विभागाने म्हटलं आहे. Income Tax विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे हे छापे घालण्यात आले होते. या उद्योगसमुहाकडून ज्या शिक्षण संस्था चालवल्या जातात त्यातल्या उच्च शिक्षणाशी संबंधीत संस्थामध्ये प्रत्येक जागांसाठी 50 ते 65 लाख डोनेशन घेऊन जागा भरल्या जात होत्या.

कशाला हवाय विरोधी पक्ष? राज ठाकरेंनी केला खुलासा!

अशा माध्यमातून ही संपत्ती गोळा करण्यात आली होती. या शैक्षणिक संस्थांच्या मुख्य विश्वस्तांच्या घरावरच्या छाप्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी संपत्ती आणि रोख रक्कम सापडलीय. त्यांच्या घरात 89 लाखांची रोख सापडली असून त्यांच्याकडे एकूण 4 कोटी 22 लाखांची रोख रक्कम सापडल्याची माहितीही देण्यात आलीय.

Income Tax विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे छापे घालण्यात आले. या छाप्यांमुळे राज्यात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आलंय. या छाप्याशी राजकीय संबंधांनाही जोडलं जात असून एवढी संपत्ती कशी जमा होऊ शकते असा प्रश्नही आता विचारला जातोय.

'मावळ प्रमाणेच रोहित पवारांचंही पार्सल जनता परत पाठवणार'

Loading...

कर्नाटकामध्ये खासगी शिक्षण संस्थांचं पेव फुटलंय. अनेक उद्योगपतींनी समाजसेवेच्या नावावर शिक्षण संस्था उभारून प्रचंड कमाई केलीय. या शिक्षण संस्था नाही तर शिक्षण संस्थांचा बाजार मांडण्यात आल्याचंही म्हटलं जातंय. श्रीमंत लोक पैशांच्या जोरावर शिक्षण संस्थांमध्ये जागा विकत घेऊन सर्व क्षेत्रच नासवत असल्याची टीकाही होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...