आम आदमी पक्षाला प्राप्तिकर विभागाची नोटीस

आम आदमी पक्षाला प्राप्तिकर विभागाची नोटीस

प्राप्तिकर विभागाला त्यांच्या देणग्यांमधे मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यानं त्यांच्याकडून दंडवसूलीसाठी नोटीस पाठवली आहे. 7 डिसेंबरपर्यंत त्यांना या नोटीसचं उत्तर देण्यास सांगितलं आहे.

  • Share this:

27 नोव्हेंबर: 30 कोटींच्या देणगीसंदर्भात प्राप्तिकर विभागाने आम आदमी पार्टीला नोटीस बजावली आहे. देणग्यांमधील अनियमिततेच्या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे.

26 नोव्हेंबरला आम आदमी पार्टीला पाच वर्षं पूर्ण झाली. त्याकरता त्यांनी मोठ्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं. प्राप्तिकर विभागाला त्यांच्या देणग्यांमधे मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यानं त्यांच्याकडून दंडवसूलीसाठी नोटीस पाठवली आहे. 7 डिसेंबरपर्यंत त्यांना या नोटीसचं उत्तर देण्यास सांगितलं आहे.

दुसरीकडे आम आदमी पार्टीनं आम्हाला मिळालेल्या सर्व देणग्या अधिकृत असून त्यात कुठलीही अनियमितता नसल्याचं सांगितलं आहे.यासंदर्भात आम आदमी पक्षाचे खजिनदार दीपक वाजपेयी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. आपने प्रत्येक पैशाचा हिशोब दिला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच हा आरोप आपची क्रांती दाबण्यासाठी केला जातो आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

त्यामुळे आता याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 27, 2017, 6:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading