आयकर विभागाची धाड, 'आप'च्या आमदाराकडून 2 कोटी 56 लाखांची रोकड जप्त

आयकर विभागाची धाड, 'आप'च्या आमदाराकडून 2 कोटी 56 लाखांची रोकड जप्त

आयकर विभागाचे अधिकारी दुसऱ्या एका ठिकाणी धाड टाकण्यासाठी गेले होते. तेव्हा आमदार बाल्यान तिथं रोकड घेऊन आले.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मार्च : आयकर विभागाने आम आदमी पार्टीचे आमदार नरेश बाल्यान यांच्या निवासस्थान परिसरात धाड टाकली. यावेळी तब्बल 2 कोटी 56 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आयकर विभागाकडून आमदार नरेश बाल्यान यांची चौकशी सुरू आहे.

आयकर विभागाने शुक्रवारी रात्री उत्तम नगरमधील आपचे आमदार नरेश बाल्यान याच्या निवासस्थान परिसरात धाड टाकली. असं सांगितली जातं की, आयकर विभागाचे अधिकारी दुसऱ्या एका ठिकाणी धाड टाकण्यासाठी गेले होते. तेव्हा आमदार बाल्यान तिथं रोकड घेऊन आले. त्यानंतर आयकर विभागानं ही कारवाई केली आहे.

नरेश बाल्यान यांच्या एवढी मोठी रोकड आली कशी, याबाबत आता आयकर विभाग त्यांची चौकशी करत आहे. याबाबत अद्याप 'आप'कडून प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आपच्या एका आमदारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला आहे. आपचे रिठाला मतदारसंघातील आमदार महेंद्र गोयल यांच्याविरोधात छेडछाडीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन आमदारांची अशी प्रकरणं समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आप आणि अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं बोललं जात आहे.


सचिनचा भावुक करणारा VIDEO, आईसाठी बनवलं वांग्याचं भरीत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 07:15 AM IST

ताज्या बातम्या