चेन्नई, 23 जानेवारी : तमिळनाडूमधील ईसाई धर्म प्रचारक पॉल दिनाकरण यांच्या निवासस्थान आणि कार्यालय मिळून 28 ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ज्या भागात आयकर विभागाने छापेमारी केली आहे, त्यात करुण्या तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था आणि जीजस कॉल्स मंत्रालयाचा समावेश आहे.
आयकर विभागाने छापेमारी दरम्यान तब्बल साडेचार किलो वजनाचं सोनं जप्त केलं आहे. तसंच छापेमारी दरम्यान 120 कोटी बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे.
द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, दिनाकरन यांच्या घरातून सोनं जप्त करण्याची आल्याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून देण्यात आली आहे.
इस्त्राईल, सिंगापूर, ब्रिटन आणि यूएस यासारख्या 12 देशांमध्ये असलेल्या कंपन्या आणि विश्वस्त कंपन्यांकडून 200 हून अधिक बँक खाती आढळली असल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे.
जीजस कॉल्स ही पॉल दिनाकरन यांच्याकडून चालवली जाणारी संस्था आहे, जी संपूर्ण तमिळनाडूमध्ये ईसाई धर्माचा प्रचार-प्रसार करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.