आयकर विभागाचे छापे घालून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न - काँग्रेस

आयकर विभागाचे छापे घालून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न - काँग्रेस

'सुडबुद्धीची कारवाई ही फक्त एकच पक्ष करत नाही तर सर्वच सत्ताधारी पक्ष करतात.'

  • Share this:

नवी दिल्ली 16 एप्रिल : द्रमुकच्या नेत्या आणि लोकसभेच्या उमेदवार कनिमोळी यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री छापे घातले. कनिमोळी यांच्या तुतीकोरीन इथल्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाचे हे छापे म्हणजे विरोधीपक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेकमनू सिंघवी यांनी केला आहे. CNNnews18 च्या Viewpoint या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा आरोप केला.

या आधीही देशातल्या अनेक राज्यांमध्ये आयकर विभागाने छापे घालून अशा प्रकारची कारवाई केली आहे. या आधी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, यांच्यासह अनेक नेत्यांवर अशी कारवाई करण्यातआली होती. त्यामुळे काँग्रेसने सरकारवर सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर काँग्रेसचे हे आरोप भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी फेटाळून लावले. स्वामी म्हणाले, आयकर विभाग हा त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत असतो. जेव्हा मोठ्या प्रमाणावर काळा पैसा असल्याची माहिती त्यांना कळते तेव्हा अशा प्रकरची कारवाई केली जाते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने ते महत्त्वाचं असतं. ही कारवाई करताना वेळ, काळ बघितला जात नाही असंही ते म्हणाले.

फक्त विरोधी पक्षांच्याच नेत्यांवर अशी कारवाई का या प्रश्नावर स्वामी म्हणाले, ज्या लोकांची माहिती कळते त्या लोकांवर कारवाई केली जाते. वेळेचा प्रश्न हा गैर लागू आहे. काँग्रेसला जर सत्ताधारी नेत्यांच्याबद्दल माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. ही माहिती आयकर विभागाला देऊन कारवाईसाठी पाठपुरावा करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

सुडबुद्धीची कारवाई ही फक्त एकच पक्ष करत नाही तर सर्वच सत्ताधारी पक्ष करतात असा आरोपही त्यांनी केला. 47 वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी सूडबुद्धीने कारवाई करत आयआयटीतून प्राध्यपक पदावरुन आपल्याला काढून टाकलं होतं आणि ती लढाई 47 वर्षांनंतर आपण न्यायालयीन लढाई जिंकलो याची आठवणही स्वामी यांनी करून दिली.

निवडणूक आयोगाने कारवाई केल्यानंतरही विविध पक्षांच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबत नाहीत कारण त्यांना धाकच वाटत नाही असं मत अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केलं. तर निवडणुकीच्या आधी तीन दिवसांची बंदी घालणं या निर्णयामुळे राजकीय पक्षांना फटका बसू शकतो असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading