हनुमानाला आयकर विभागाने पाठिवली 2 कोटींची नोटीस, नोटबंदीनंतर जमा केले होते पैसे

हनुमानाला आयकर विभागाने पाठिवली 2 कोटींची नोटीस, नोटबंदीनंतर जमा केले होते पैसे

तब्बल 2 कोटी 23 लाख 88 हजार 730 रुपयांच्या कर चोरीप्रकरणी आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

इंदौर, 10 डिसेंबर : नोटबंदीनंतर बँकेत जमा करण्यात आलेल्या पैशावरून देशभरात आयकर विभागाने अनेकांना नोटीस पाठवली होती. पण आता आयकर विभागाने आता थेट हनुमानाला नोटीस पाठवल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण थोडं-थोडकं नाही तर 2 कोटी 23 लाख 88 हजार 730 रुपयांचं आहे.

इंदौरमधील प्रसिद्ध रणजीत हनुमान मंदिराला आयकर विभागाकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंतची वेळही देण्यात आली आहे. तब्बल 2 कोटी 23 लाख 88 हजार 730 रुपयांच्या कर चोरीप्रकरणी आयकर विभागाने हनुमान मंदिराला ही नोटीस पाठवली आहे.

'...तर अमित शहांवर निर्बंध घाला', अमेरिकन आयोगाची मागणी

नोटबंदीवेळी रणजीत हनुमान मंदिरातील दानपेटीतून 26 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळाली होती. हे पैसे मंदिर प्रशासनाने मंदिराच्या नावाने बँक खात्यात जमा केले होते. इतकी रक्कम एकत्रितरित्या जमा झाल्याने आयकर विभागाने प्रकरण संशयित असल्याचं म्हटलं. त्यानंतर आयकर विभागाने मंदिराच्या दानपेटीत जमा होणारी एका वर्षाची रक्कम काढली तर ती सव्वा दोन कोटींहून अधिक होती.

कर आणि दंड

रणजीत हनुमान मंदिराची ट्रस्ट आयकर अॅक्टमध्ये रजिस्टर केलं नसल्याची बाब आयकर विभागाच्या तपासादरम्यान समोर आली. त्यानंतर आयकर विभागाने मंदिराचं संपूर्ण उत्पन्न काढून त्यावर 77 टक्के कर लावला. मंदिरावरील कराची ही रक्कम जवळपास दोन कोटींपर्यंत पोहोचली आहे. याबाबतची नोटीस मंदिर प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.

मंदिर प्रशासनाचा खुलासा

'आयकर विभागाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर सीएच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात आली आहेत. मंदिर सरकारी जमिनीवर असून ते जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित येते. जिल्हाधिकारीच याचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच प्रशासक म्हणून माझी नियुक्ती केली आहे. धर्मविषयक कामांसाठी मंदिराच्या खजिन्याचा वापर करण्यात येतो आणि त्यासाठी आयकर नोंदणी गरजेची नाही,' असा खुलासा मंदिर प्रशासकाडून करण्यात आला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 10, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading