पाहा VIDEO : Zomato नंतर नवा वाद, मुस्लीम अँकरला पाहून डोळे केले बंद

पाहा VIDEO : Zomato नंतर नवा वाद, मुस्लीम अँकरला पाहून डोळे केले बंद

'अन्नाला कोणताही धर्म नसतो', असं Zomato ने म्हटलं होतं. पण याच विषयावर चर्चा करताना पुन्हा तशीच एक घटना घडली. टीव्हीवरच्या चर्चेत मुस्लीम अँकर दिसला म्हणून 'हम हिंदू' च्या संस्थापकांनी डोळे मिटून घेतले.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : 'झोमॅटो'चा डिलिव्हरी बॉय मुस्लीम आहे म्हणून जेवणाची ऑर्डर घ्यायला नकार देणाऱ्या अमित शुक्ल याला आता पोलिसांनी दणका दिला आहे. या सगळ्या प्रकरणाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली.

अन्नाला कोणताही धर्म नसतो असं Zomato ने म्हटलं होतं. पण याच विषयावर चर्चा करताना पुन्हा तशीच एक घटना घडली. हे घडलं, 'हम हिंदू' या संघटनेच्या संस्थापकांबदद्ल. लाइव्ह टीव्ही वर मुस्लीम धर्माचा अँकर दिसला म्हणून त्यांनी डोळे बंद करून घेतले.अजय गौतम हे 'हम हिंदू' या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे संस्थापक आहेत. मुस्लिमांचा अनुनय करण्याच्या राजकारणाविरोधात आम्ही काम करतो, असा त्यांचा दावा आहे.

गौतम यांना न्यूज 24 या टेलिव्हिजन न्यूज चॅनलवरच्या डिबेट शो मध्ये बोलवलं होतं. Zomato च्या डिलिव्हरी बॉयबदद्ल जे घडलं तोच या चर्चेचा विषय होता. गौतम यांनी खलिद नावाच्या या अँकरला पाहिलं आणि डोळे बंद करून घेतले.

अजय गौतम यांची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर अजय गौतम यांच्यावर जोरदार टीका होते आहे.

VIDEO : या शहाण्या माकडाने पाणी पिऊन झाल्यावर नळ केला बंद

Zomatoवरून दिलेली ऑर्डर मुस्लीम डिलिव्हरी बॉय घेऊन येत असल्याने ती घेण्यास नकार दिल्याच्या घटनेवरही चर्चा सुरू आहे. यानंतर या प्रकरणातल्या डिलिव्हरी बॉयची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमित शुक्ल नावाच्या या व्यक्तीने Zomato जेवणाची ऑर्डर दिली होती. पण जेव्हा त्याला कळलं की ऑर्डर घेऊन येणारी व्यक्ती मुस्लीम आहे. यावर त्याने Zomatoला डिलीव्हरी बॉय बदलण्यास सांगितला. या गोष्टीला Zomatoने नकार दिल्याने अमितने ऑर्डरच रद्द केली आणि पैसे देखील देऊ नका असं सांगितलं होतं.

Zomatoसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या फैयाजने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. होय, या प्रकरणामुळे मी दु:खी झालो आहे. पण मी काय करू शकतो... लोक काहीही बोलतात. त्यावर मी काही करू शकत नाही. आमच्या सारख्या गरीब लोकांना अशा गोष्टी सहन कराव्या लागतातच, असं त्याने म्हटलं होतं.

=======================================================================================================

VIDEO :पोलीस मामा आले धावून, टोपल्यात बाळाला ठेवून पुरातून काढलं बाहेर

Published by: Arti Kulkarni
First published: August 2, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading