उत्तराखंड, 5 जून : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान सरकारी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना पगार कपातीबरोबरच यंदाच्या वर्षाची पगारवाढही मिळणं कठीण झालं आहे. अशातच उत्तराखंडमध्ये असलेल्या भाजप सरकारवर कर्मचाऱ्यांना भत्ता आणि थकबाकी कशी द्यावी हा प्रश्न पडला आहे.
याबाबत उत्तराखंड रोजवेजचे एमडी (Uttarakhand Roadways) आशिष चौहान यांनी ट्वीट केलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त ट्वीट केलं आहे. आशिष चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 100 बसेस आहेत. ज्यांचा लिलाव होऊ शकतो. बसच्या लिलावातून 5 कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यातून ज्या कर्मचार्यांना भत्ता/थकबाकी दिलेली नाही ती देता येईल. कर्मचाऱ्यांसाठी या निधीचा वापर केला जाऊ शकतो. राज्य सरकारकडे 20 कोटी रुपयांची आगाऊ रक्कमही मागविण्यात आली आहे.
हे ही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता सीएम ममता बॅनर्जी
We have 100 buses which can be auctioned. Auction of buses is expected to generate Rs 5 crores which can be used to pay allowances/arrears to employees. Rs 20 crores advance has also been sought from the State government: Ashish Chauhan, MD, Uttarakhand Roadways
— ANI (@ANI) June 5, 2021
Buses auction kar do usse employees ko allowances dedo. Phir unko cab se travel karwake travel charges ke naam pe allowances wapas le lo pic.twitter.com/k4ps6hYDXh
— Jitesh (@JRism9) June 5, 2021
दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत शनिवारी (5 जून) अचानक दिल्लीला रवाना झाले आहे. तेथे संरक्षण मंत्री राजधान सिंह आणि रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ शकतात. यादरम्यान तिसऱ्या लाटेची तयारी, कोविड कर्फ्यूबाबत शिथिलता आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Uttarakhand