लखनऊ, 14 सप्टेंबर : केवळ महाराष्ट्रचं नाही तर अख्खं जग नतमस्तक होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आता उत्तर प्रदेशातही होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi aaditanath) यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. योगींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ही घोषणा केली आहे.
याबाबत योगी म्हणाले की, आग्र्यातील निर्माणाधीन मुघल म्युजियमला छत्रपती शिवाजी महाजारांचं नाव देण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश सरकार राष्ट्रवादी विचारांवर चालणारी आहे. गुलामी मानसिकतेच्या प्रतिकात्मक चिन्हांना दूर करीत राष्ट्राप्रती गौरव करणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. 'आमचे नायक मुघल होऊ शकत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजचं आमचे नायक आहेत. ' मुख्यमंत्री योगींनी व्हिडीओ कॉन्फरन्गिंच्या माध्यमातून आग्रा मंडळाच्या विकास कार्यांवरील चर्चेदरम्यान याला मंजुरी दिली आहे.
आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, पण त्याचे कारण ठरलेले आधीचे सगळेच प्रसंग पाहिले तर मिर्झाराजांसारख्या मुत्सद्दय़ाला शिवरायांनी किती मुत्सद्दीपणे तोंड दिलं हे लक्षात येतं. त्यामुळे आग्र्यात जाऊन महाराजांनी मोठी कामगिरी फत्ते केली आहे. जी आज अनेकांना अशक्य वाटेल.
हे ही वाचा-India-China Faceoff: LACवर तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्या आग्रा दरबाराला दिलेली भेट आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतेपर्यंतच्या घडामोडी हा आजवर अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्वपूर्ण कालखंड होता. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अंमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी जिंकली. त्यासंदर्भात इतिहासकारांसह अनेकांना वाटणारं कुतहूल आणि आकर्षण स्वाभाविकच. त्यामुळेच केवळ मराठीतच नव्हे तर भारतीय भाषांमध्येही शिवाजी महाराजांच्या या कालखंडाचा अभ्यास अनेकांना करावासा वाटतो. आग्र्यातील मुघल म्युजियमला महाराजांचं नाव दिल्याने पुन्हा त्यांच्या यशाची गाथा तेथील प्रत्येकापर्यंत पोहोचेल.