धक्कादायक! 400 तरुणींना त्यानं केलं ब्लॅकमेल, अटकेनंतर समोर आल्या या भयानक गोष्टी

धक्कादायक! 400 तरुणींना त्यानं केलं ब्लॅकमेल, अटकेनंतर समोर आल्या या भयानक गोष्टी

तरुणींशी ऑनलाइन चॅट करून त्यांना जाळ्यात ओढायचं आणि मग ब्लॅकमेल करायचं असा प्रकार करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे.

  • Share this:

लखनऊ, 28 जानेवारी : तंत्रज्ञान प्रगत झालं तसं त्या तंत्रज्ञानामुळे वाढणारे धोकेही सतत समोर येत आहेत. तरुणींशी ऑनलाइन चॅट करून त्यांना जाळ्यात ओढायचं आणि मग ब्लॅकमेल करायचं असा प्रकार करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यात अखेर पोलिसांना यश  आलं आहे.

हा प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. तरुणी आणि स्त्रियांच्या नकळत त्यांची खासगी माहिती मिळवून त्यांना एक व्यक्ती ब्लॅकमेल (blackmail) करत होता. या व्यक्तीला पोलिसांनी मंगळवारी गोसावीगंज इथून अटक केली आहे. बर्लिंग्टन चौकाजवळ या आरोपीला पोलिसांनी पकडलं. या आरोपीविरुद्ध एका तरुणीनं चॅट (chat), फोटो आणि व्हीडिओ (video)व्हायरल (viral) करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली होती. सायबर सेलच्या (cyber cell) टीमनं आरोपीजवळून लॅपटॉप (laptop) आणि मोबाईल (mobile) हस्तगत केला.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त व्हीके तिवारी यांच्या सांगण्यानुसार, मंगळवारी पीजीआय भागात राहणाऱ्या एका तरुणीनं या प्रकारची तक्रार दिली होती. यावर खटला दाखल करून घेत अतिरिक्त निरीक्षक रमेश चंद्र पांडेय यांनी सायबर सेलची मदत घेत या व्यक्तीचं नाव आणि फोन नंबर शोधला. ही व्यक्ती शहाजहांपूर इथला विनीत मिश्रा हा 25 वर्षांचा युवक असल्याचं समोर आलं. तपास करत असलेल्या टीमनं बर्लिंग्टन चौकातून या युवकाला ताब्यात घेतलं.

आरोपीकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये 400 मुलींचे खासगी फोटोज, व्हीडिओ आणि चॅट आढळून आल्या. पोलिसांना संशय आहे, की हा माणूस व्यापक पातळीवर महिला आणि मुलींना ब्लॅकमेल करत होता. तो हे काम गेली तीन ते चार वर्ष करत होता. आजवर त्यानं अशा कामातून पाच लाख रुपये उकळले आहेत. पोलीस आता या आरोपीच्या बँक खात्याची माहिती जमवत आहेत.

हा आरोपी इंटरनेटवर एक लिंक (link) जनरेट करायचा. ती लिंक मुलींना फेसबुक(facebook), व्हॉट्सऍप (whatsapp) आणि इन्स्टावर पाठवायचा. ही लिंक मुलींनी ओपन केली, की आरोपीला मुलींच्या वैयक्तिक खात्यात प्रवेश मिळायचा. मग तो खासगी गोष्टी चोरून पुढं मुलींना ब्लॅकमेल करत असे. ही पद्धत आरोपीनं युट्युब (youtube) पाहून शोधली असं त्यानं कबूल केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: January 28, 2021, 8:42 PM IST

ताज्या बातम्या