वाह! मध्य प्रदेशातील या गावातल्या पिढीनं आयुष्यभर घातली फक्त खादी, यानंतर केली होती प्रतिज्ञा

वाह! मध्य प्रदेशातील या गावातल्या पिढीनं आयुष्यभर घातली फक्त खादी, यानंतर केली होती प्रतिज्ञा

जुन्या पिढीतले अनेक लोक तत्वनिष्ठ आणि ध्येयवादी असतात. अशाच आदर्श तत्वनिष्ठेचा प्रत्यय या गावातल्या लोकांनी आयुष्यभर दिला आहे.

  • Share this:

भोपाळ, 20 जानेवारी : खादी (khadi) हा शब्द ऐकला की आठवतात महात्मा गांधी (Mahatma Gandhi). सोबतच आठवतो भारताचा स्वातंत्र्यलढा (Indian freedom struggle). आपल्या देशात खादी हे समर्पण, त्याग आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. मध्यप्रदेशातील रतलाममध्ये एक असं गाव आहे, की जिथं एका पिढीतले (generation) लोक हयातभर केवळ खादी घालत आहेत.

या गावातील सहा वयोवृध्दांनी आयुष्यभर दुसऱ्या कपड्यांना अजिबातच हातसुद्धा लावला नाही. आजही हे सगळे सहाजण केवळ खादीच अंगावर घालतात. हे गाव आहे रतलामपासून 15 किलोमीटर दूर वसलेलं रुपाखेडा. इथली खादीप्रेमी पिढी आता वयोवृद्ध झाली आहे.

या पिढीतल्या सगळ्यांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान (freedom struggle) महात्मा गांधी यांनी केलेल्या आवाहनानुसार खादीला आपलंसं केलं. आणि हे सगळे आजही गांधीजींच्याच पाऊलखुणावर प्रामाणिकपणे चालत आहेत. हे सगळेजण आर्थिकदृष्ट्या अगदीच संपन्न घरातील आहेत. मात्र ब्रँडेड, महागड्या कपड्यांचा मोह टाळून या सगळ्यांनी हे व्रतच जणू अंगिकारलं.

या खादीप्रेमी व्यक्तींच्या मते, खादी घातल्यानं पूर्वी  अनेकांच्या हाताला त्यातून रोजगार आणि पैसा मिळायचा. या विचारातूनच तेव्हा सुरू केलेला हा खादी घालण्याचा प्रवास त्यांनी आजवर जपला आणि टिकवला आहे. आता खादीचे कपडे रेडिमेड मिळतात. तेव्हा मात्र हे कपडे चरख्यावर सूत कातून बनवले जायचे. या गावात 1980 साली सर्वोदय संस्थेचं शिबीर झालं. यातून या गावकऱ्यांचं खादीबाबत कुतूहल वाढलं. यातील काही लोकांनी प्रतिज्ञा केली, की आता आजन्म खादीच घालणार.

रुपाखेडा गावात 1955 ते 1971 या काळात सर्वोदयी संस्थेची (Sarvoday Sanstha) शाळाही चालायची. इथं चरखा चालवण्यापासून गांधीजींच्या आदर्शांचा वास्तुपाठही दिला जायचा. गावातली ही पिढी याच शाळेत शिकली. सर्व लोकांनी चरखासुद्धा चालवला आहे.

Published by: News18 Desk
First published: January 20, 2021, 9:12 AM IST

ताज्या बातम्या