'या' एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमतची हुलकावणी

तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली असून 44 वरून 76 जागा मिळणार आहे. त्यामुळे बहुमतासाठी भाजपला घटकपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 11:16 PM IST

'या' एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमतची हुलकावणी


मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. आता 23 मे रोजी मतमोजणी होईल आणि जनतेचा कौल स्पष्ट होईल. परंतु, त्याआधी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार पुन्हा येणार असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टीव्ही सीएनएक्स या वृत्तवाहिनीनेही आपल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 290 ते 310 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

तर यूपीएला 115-125 जागा मिळतील. परंतु, भाजपच्या वाट्याला 251 जागा येतील, त्यामुळे बहुमताची हुलकावणी मिळणार आहे. तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली असून 44 वरून 76 जागा मिळणार आहे. त्यामुळे बहुमतासाठी भाजपला घटकपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे.


'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार आलेले अंदाज

Loading...


पक्ष जागा (542) टक्केवारी


NDA 336 48.5 टक्के


भाजप 276 39.6 टक्के


घटकपक्ष 60 8.9 टक्के


UPA 82 25.0 टक्के


काँग्रेस 46 18.8 टक्के


आघाडी 36 6.2 टक्के


अन्य 124 26.5 टक्के


टीएमसी 38 4.5 टक्के


सपा 10 2.1 टक्के


बसपा 7 2.5 टक्के


टीआरएस 12 1.6 टक्के


बीजेडी 13 2.0 टक्के


YSRCP 13 1.9 टक्के


डावे 12 2.6 टक्के


आप 1 0.2 टक्के


टीडीपी 11 1.9 टक्के


अन्य 7 7.2 टक्केगेल्या निवडणुकीत यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा; यावेळीचा Exit Poll आहे असा!


लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय तज्ञांचे आणि एक्झिट पोलचे अंदाज चूकवत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसचा ऐतिहासिक असा पराभव झाला होता. भाजपच्या या विजयाबद्दल अनेकांना धक्का देखील बसला होता. देशाचे राजकीय चित्र बदलणाऱ्या या निवडणुकीचा अचूक अंदाज मात्र एका संस्थेने व्यक्त केला होता. 2014मध्ये भाजपच्या विजयाची जेवढी चर्चा झाली होती तेवढीच चर्चा या संस्थेच्या एक्झिट पोलबद्दल झाली होती.


चाणक्य या संस्थेने 12 मे 2014 रोजी भाजपच्या विजयाबद्दलचा अचूक अंदाज व्यक्त केला होता. तेव्हा भाजपला 392 (/-14) जागा मिळतील असे चाणक्यने सांगितले होते. प्रत्येक्षात 16 मे रोजी भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. आता देखील 2019चा चाणक्यचा संपूर्ण देशाचा आणि प्रत्येक राज्यातील एक्झिट पोल जाहीर झाला आहे.


लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने वर्तवला आहे. तर भाजप नेतृत्वाखालील NDAला 350 जागा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसला यंदा देखील दुहेरी संख्या पार करता येणार नाही. या एक्झिट पोल नुसार त्यांना 55 जागा मिळणार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना 44 जागा मिळाल्या होत्या हे विशेष. तर काँग्रेस नेतृत्वाखालील UPAला 95 जागा मिळणार आहेत. तर अन्य पक्षांना 97 जागा मिळतील.

==================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2019 11:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...