नवी दिल्ली, 19 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरच्य्या संसर्गात (Coronavirus) दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवार सायंकाळपर्यंत देशात एकूण 16,116 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे समोर आले आहे. याशिवाय 519 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात 170 जिल्ह्यांना कोरोना हॉटस्पॉट (Corona hotspot) घोषित करण्यात आला आहे. यामधये देशातील 10 असे जिल्हे आहेत जे कोरोना संक्रमण (Covid 19) मुळे सर्वाधिक प्रभावित झालेले आहेत. यामधून एकूण रुग्णसंख्येपैकी 6,540 रुग्ण आहेत. देशात एकूण रुग्णांपैकी 46.39 बाधित या भागातील आहेत.
170 जिल्हे हॉटस्पॉट
देशात 732 जिल्ह्यांमधील 406 जिल्हांमध्ये कोरोनाचे कमीत कमी एक रुग्ण समोर आला आहे. यानुसार 55.46 जिल्हांमध्ये कोरोना प्रभाव आहे. ही संख्या 23 मार्च रोजी 84 होती 9 एप्रिल रोजी ती 284 पर्यंत पोहोचली आहे आणि आता 406 इतकी झाली आहे. 406 मधील 170 जिल्हे हॉटस्पॉट आहेत. 170 मधील 123 जिल्ह्यांमध्ये 15 हून अधिक संख्या समोर आली आहे.
16 राज्यांमधील हे जिल्हे हॉटस्पॉट-
1. तमिळनाडु (22 जिल्हे)
2. महाराष्ट्र (14)
3. उत्तर प्रदेश (13)
4. राजस्थान (12)
5. आंध्र प्रदेश (11)
6. दिल्ली (10)
7) तेलंगणा (9)
8. जम्मू आणि काश्मीर (8)
9. पंजाब (8)
10. कर्नाटक (8)
11. केरळ (7)
12. मध्य प्रदेश (6)
13. हरियाणा (6)
14. गुजरात (6)
15. आसाम (5)
16. हिमाचल प्रदेश (5)
18 एप्रिलपर्यंत सर्वाधिक प्रभावित 10 कोरोना हॉटस्पॉट जिल्हे
1. मुंबई - 2079 कोरोना पॉझिटिव्ह
2. इंदूर- 842
3. नवी दिल्ली- 802
4. अहमदाबाद- 590
5. पुणे- 496
6. जयपुर- 489
7. हैद्राबाद- 407
8. दक्षिण दिल्ली- 320
9. ठाणे- 293
10. चेन्नई- 222
100 पेक्षा अधिक रुग्ण असणारे 20 जिल्हे
देशभरात 20 जिल्हे असेही आहेत जेथे 100 हून अधिक कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरण समोर आली आहेत. देशात एकूण कोरोना पॉझिटिव प्रकरणात या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या 50 टक्के इतकी आहे. यासह एकूण मृत्यूंमध्ये या 20 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या 67 टक्क्यांएवढी आहे. यामध्ये दक्षिण दिल्ली, नवी दिल्ली, मध्य दिल्ली, आग्रा, जयपुर, जोधपुर, भोपाळ, अहमदाबाद, वडोदरा, इंदूर, ठाणे, मुंबई, पुणे, कासरगोड, हैद्राबाद, चेन्नई, कुरनूल, गुंटूर, कोयम्बतूर आणि कलकत्ता यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांमध्येगी झपाट्याने वाढतेय संख्या
देशातील अन्य जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. तामिळनाडुमधील तिरुपुर (79 केस वाढले) और तिरुचिरापल्ली (46), महाराष्ट्रातील नाशिक (55), जम्मू-काश्मिरातील बारामूला (40), दक्षिण दिल्ली (24), अमृतसर (7), बस्ती (11) आणि रांची (13) यांचा समावेश आहे.
संबंधित - धक्कादायक! 24 तासात 552 नवे कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
पंतप्रधान मोदीं LinkedIn वर, लॉकडाऊनदरम्यान बदललेल्या जीवशैलीबाबत दिला संदेश