नरेंद्र मोदी 2019 मध्ये कुठून लढणार निवडणूक, अमित शहांनी केला खुलासा

नरेंद्र मोदी 2019 मध्ये कुठून लढणार निवडणूक, अमित शहांनी केला खुलासा

नरेंद्र मोदी पुढील निवडणूक कुठून लढणार आहेत याची घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक कुठून लढणार यांवर सर्वांचे लक्ष लागून आहे. नरेंद्र मोदी हे गेल्यावेळेस वाराणसी आणि वडोदरा या दोन ठिकाणांहून निवडणूक लढले हेतो. याविषयावर आत्तापर्यंत बनून राहिलेल्या सस्पेंस आता संपलाय. नरेंद्र मोदी पुढील निवडणूक कुठून लढणार आहेत याची घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली. आणि त्यांचा पक्षच बहुमताने सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

नेटवर्क18 चा विशेष कार्यक्रम 'बैठक' मध्ये अमित शहा यांनी नरेंद्र मोदी हे आगामी निवडणूक वाराणसी येथून लढणार असल्याचं स्पष्ट केलं. या कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, कुणाला चांगले वाटावे यासाठी आम्ही कधीच निर्णय घेतले नाहीत, तर चांगले परिणाम देणारे निर्णय आम्ही घेतलेय. युती करून आम्ही सत्तेवर मिळवली, पण देशहिताचेच निर्णय आम्ही घेतले त्यात आम्ही कधी समझौता केला नाही. मायावती म्हणाल्या होत्या की, देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार हवी आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता ठरवेल की कशा प्रकारचं सरकार हवंय.

मॉब लिंचिग प्रकरणांवर बोलताना त्यांनी आमच्या सरकारवर या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही.त्यात ज्यांची नावे आहेत त्यांच्यावह आम्ही कठोर कारवाई केली आहे.

एनआरसीच्या मुद्द्यावर बोलतांना त्यांनी घुसखोरांना देशात राहण्याचा मुळीच अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आसाममध्ये एनआरसीचा निर्णय राजीव गांधी यांनी घेतला होता. घुसखोरांना बाहर काढण्यासाठी राजीव गांधी यांनीच समझौता केला होता. काँग्रेसमध्ये NRC लागू करण्यासाठी दम नव्हता असंही त्यांनी सांगितलंय. काँग्रेस ममता बनर्जी यांच्या आड NRC चं राजकारण करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

EVM चा विरोध करणाऱ्यांवर पण त्यांनी निशाणा साधला. जे हरले आहेत ते आता EVM च्या विषयावर राजकारण करीत असल्याचं ते म्हणाले. प्रथम त्यांनी आपण का हरलो याचा शोध घ्यावा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

आमचा नेता देशाच्या खजिन्यावर लक्ष ठेऊन आहे. मोदी सरकारने स्वंरोजगारावर भरपूर काम केलंय, तब्बल 12 कोटी लोकांना आम्ही रोजगार दिलाय. पण राहुल गांधी यांनी संसद, पंतप्रधानपदाचा अपमान आणि विरोधी पक्षाची अवहेलना केली असल्याची टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा..

पटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास

मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे !

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मुंबईकर मेजर केपी राणे शहीद

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 10:32 PM IST

ताज्या बातम्या