मुंबई, 22 मार्च : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात 'जनता कर्फ्यू' (Janata Curfew) लागू करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोनाशी (Covid - 19) लढा देणाऱ्या लढवय्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता नागरिकांनी घराबाहेर किंवा बाल्कनीत उभं राहून टाळ्या वाजवाव्यात किंवा थाळीनाद, घंटानाद करीत सर्वांचे आभार व्यक्त करण्याचे आवाहन केले होते.
मात्र आज सायंकाळी 5 नंतर घंटानाद करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र जमा झाले. काहींनी तर डिजे वाजवत नाचत मिरवणूक काढली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, लहान मुलं सहभागी झाले. पंतप्रधानांनी सर्वांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास सांगितल्यानंतरही अनेकांनी रस्त्यांवर गर्दी केली. या सर्व प्रकारावर समाज माध्यमांतून मोठी टीका केली जात आहे. लोक व्हिडीओ शेअर करीत यावर संताप व्यक्त करीत आहेत.
संबंधित - कोरोनाची दहशत, संशयातून गर्भवती महिलेला मारहाण; जीवेमारण्याचा केला प्रयत्न
जनता कर्फ्यूदरम्यान एक व्हिडीओ बॉलिवूड अभिनेता रोनीत रॉयने शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ निराश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये लोक संध्याकाळी टाळ्या वाजवत, थाळी वाजवत आणि घराबाहेर पडले आहे. या व्हिडीओत तर लोकांनी टाळ्या व थाळ्या वाजवत मिरवणूक काढली आहे.
I mean seriously????????? pic.twitter.com/vyyromfi0h
— Ronit Bose Roy (@RonitBoseRoy) March 22, 2020
Which part of #socialdistancing and #socialisolation did you not understand 😑 #coronavirusinindia pic.twitter.com/PutyIREMgc
— Parvin Dabas (@parvindabas) March 22, 2020
बॉलिवूड अभिनेता रोनीत रॉय यांनी आज एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर लिहिले 'खरंच?' यावर बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्तानेही प्रतिक्रिया दिली आहे. दिव्य दत्ता यांनी लिहिले आहे की, 'गंभीरपणे? त्यांना ते समजतं नाहीये का!!! देवा, त्यांना घरी कसं ठेवता येईल.
बॉलिवूड निर्माता अतुल कसबेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘ की घंटा आणि शिट्ट्यांमधून कोरोना व्हायरस नष्ट होईल, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. हा मूर्खपणा आहे. असं म्हणत त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. जेव्हा सोशल डिस्टन्सिंगबद्दल सांगितल्यानंतरही लोक असं वागत आहेत’. याशिवाय दिग्दर्शक प्रवीण दाबास यांनीही अशाच स्वरुपाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे
संबंधित - नवी मुंबई, पनवेलमध्ये 'जनता कर्फ्यू'च उल्लंघन, 18 जणांवर कारवाई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india