S M L

रुग्णालयात जखमींना भेटायला आलेल्या कमल हासनला घ्यावा लागला काढता पाय

आज जखमींना भेटण्यासाठी कमल हासन रुग्णालयात गेला.मात्र त्याला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

Sonali Deshpande | Updated On: May 23, 2018 03:23 PM IST

रुग्णालयात जखमींना भेटायला आलेल्या कमल हासनला घ्यावा लागला काढता पाय

तूतिकोरिन, २३ मे : काल तामिळनाडूमध्ये एका स्टरलाईट इंडस्ट्रीच्या कामगारांचे आंदोलन झाले.यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठाचार्ज केला, ज्यात अनेक लोक जखमी झाले.त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज जखमींना भेटण्यासाठी कमल हासन रुग्णालयात गेला.मात्र त्याला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

तुम्ही रुग्णालयात आलात म्हणून आम्हाला अडचणींना समोर जावं लागतं आहे,असं लोक म्हणत कमल हासन यांना रुग्णालयातून निघून जाण्यास सांगितले.

तामिळनाडूच्या तूतिकोरिन जिल्ह्यात वेदांत ग्रुपच्या स्टरलाईट काॅपर युनिटच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज आणि गोळीबारामुळे 11लोकांचा मृत्यू आणि ३०हून अधिक जण जखमी झालेत. सध्या या भागात कलम १४४ लागू केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2018 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close