S M L

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात नऊ जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2018 03:07 PM IST

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात नऊ जवान शहीद

13 मार्च : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात सीआरपीएफचे नऊ जवान शहीद झाले आहे. तर  25पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहे. . रात्री जगंलात गस्त घालत असताना नक्षलींनी आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं CRPFच्या 212 बटालियनजवळ आधी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला.  यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत.

सुकमा जिल्ह्यातील किस्तराम इथं हा हल्ला झाला. रात्री गस्त घालण्यासाछी सीआरपीएफचे जवान एंटी लँजमाईन वाहनांनी जात होते, त्यावेळी सुरुंगाद्वारे स्फोट घडवून आणला. यामध्ये वाहन जळून खाक झालं. सीआरपीएफच्या 112 बटालियनचे जवानांकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यावेळी येथील जंगलात दबा धरून बसलेल्या सुमारे 100 नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close