'या' देशाला मदत न पाठवल्यास 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू!

'या' देशाला मदत न पाठवल्यास 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू!

या देशात कडक उन्हाळ्यामुळे 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मोगादिशु, 06 जून: भारतातील अनेक शहरात तापमान 45 डिग्रीच्या पुढे गेले आहे. उन्हाच्या झळा असहाय्य होत आहे. कधी एकदा पावसाला सुरुवात होईल याच्या प्रतिक्षेत अनेक जण आहेत. जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जेथे उन्हाळ्यामुळे 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. आफ्रिका खंडातील सोमालिया देशात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या माहितीनुसार जर उन्हाळा संपण्याआधी मदत पाठवली नाही तर देशातील 20 लाखाहून अधिक पुरुष, महिला आणि मुलांचा भूकबळी होऊ शकतो.

युएनचे सचिव जनरल मार्क लोकॉक यांनी सांगितले की, दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी सोमालियाला 70 कोटी डॉलरची गरज आहे. पाऊस न पडल्यामुळे प्राण्यांचा मृत्यू होत आहे आणि शेती देखील नष्ट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मदत पथकाने इथोपिया, केनियासह सोमालिया या देशातील दुष्काळी भागातील नागरिकांसाठी दैनंदिन वापराच्या गोष्टी, अन्न, पाणीसाठी 4.5 कोटी डॉलरचा निधी उभा केला आहे.

सोमालियाची लोकसंख्या 1.5 कोटी इतकी आहे. यातील 30 लाख नागरिक दैनंदिन जेवण मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. हिवाळ्याच्या तुलनेत देशात अन्नधान्याची कमतरता आहे. सोमालियातून दुष्काळामुळे अन्नधान्याची कमतरता आहे. नागरिकांकडे पिण्यासाठी पुरेसे पाणी देखील नाही. त्यातच असाध्य रोग पसरण्याची शक्यता आहे.

सोमालियाच्या शेजारी असलेल्या इथोपिया आणि केनियात देखील गेल्या काही वर्षापासून पाण्याची टंचाई आहे. पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे या देशांमधील शेती नष्ट होत चालली आहे आणि अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून या देशातील नागिरकांपर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जागातील अन्य देशांना पुढाकार घेण्याचे आव्हान करत आहेत.

VIDEO: लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी

First published: June 6, 2019, 12:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading