मराठी बातम्या /बातम्या /देश /दारुबंदी अधिक कडक; एखादी जरी बाटली सापडली तरी दुकान जप्त करुन होणार लिलाव

दारुबंदी अधिक कडक; एखादी जरी बाटली सापडली तरी दुकान जप्त करुन होणार लिलाव

दारूबंदी यशस्वी व्हावी यासाठी सरकार विविध नियम अमलात आणत असतं. या राज्यात मात्र आता आणखीच कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे.

दारूबंदी यशस्वी व्हावी यासाठी सरकार विविध नियम अमलात आणत असतं. या राज्यात मात्र आता आणखीच कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे.

दारूबंदी यशस्वी व्हावी यासाठी सरकार विविध नियम अमलात आणत असतं. या राज्यात मात्र आता आणखीच कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे.

पाटणा, 7 फेब्रुवारी : बिहारमध्ये (Bihar) दारूबंदी (alcohol ban) लागू आहे आणि सरकारच्या दाव्यानुसार या कायद्याचं अगदी काटेकोर पालन केलं जात आहे. मात्र बिहारच्या विविध भागांमधून अवैध (illegal) दारूचे साठे जप्त केल्याच्या बातम्या अधूनमधून येत राहतात. आता मात्र कदाचित चित्र बदलू शकतं. आता नुकतंच बिहारची राजधानी पाटणा (Patna) इथून पोलिसांनी (police) कोट्यवधी रुपयांची अवैध दारू जप्त केली. बायपास पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गोदामावर छापा मारत ही दारू जप्त केली गेली. यानंतर प्रशासनानं या भागात दारूबंदीचे नियम (rules) अजूनच कडक केले आहेत.

पटना विभागातील कमिश्नरने (commissioner) लागू केलेल्या नव्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे, की यापुढे कुठेही दारूचा साठा असल्याचं कळालं, तर कडक कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांनी हेसुद्धा स्पष्ट केलं आहे, की ज्या गोदाम किंवा दुकानातून (shop) दारू जप्त केली जाईल तिच्यावर प्रशासन जप्ती आणेल आणि नंतर त्याचा लिलावही (auctioned) केला जाईल.

हे ही वाचा-कायच्या काय, शिफ्टिंग करताना सामान नाही तर अख्खं घरच उचललं! पाहा व्हायरल Video

पाटणा विभागाचे कमिश्नर संजय कुमार अग्रवाल यांनी यासंदर्भानं शुक्रवारी एक बैठक बोलावली. त्यांच्या अधिकारक्षेत्रात येणारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही या बैठकीत उपस्थित होते. पाटणा, नालंदा, भोजपूर, बक्सर, रोहतास आणि कैमूरचे अधिकारी यात सहभागी होते. बिहारमध्ये पूर्ण दारूबंदी एप्रिल 2016 ला लागू झाली होती. या निर्णयासाठी नितीश कुमार (Nitish Kumar) सरकारचं लोकांनी खूप कौतुकही केलं होतं. मात्र यानंतरही बिहारमध्ये विविध ठिकाणी लपूनछपून दारू मिळणं सुरूच राहिलं. राज्यात काही काळापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही हा मुद्दा समोर आला होता.

First published:

Tags: Bihar, Nitish kumar