मोदींच्या भारतात EVM मध्ये 'गुढ' शक्ती, कार्यकर्त्यांनी सावध राहावं - राहुल गांधी

आता तरी तुमचा EVM मशिन्सवर विश्वास बसणार आहे का असा सवाल लोकांनी राहुल यांना केला.

News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2018 09:27 PM IST

मोदींच्या भारतात EVM मध्ये 'गुढ' शक्ती, कार्यकर्त्यांनी सावध राहावं - राहुल गांधी

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : EVM मशिन्समध्ये भाजप गडबड करण्याची शक्यता असून मतमोजणी होणार असलेल्या सर्व राज्यांमध्ये कार्यकर्त्यांनी सावध राहावं असं आवाहन काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. राजस्थान आणि तेलंगणातलं मतदान संपल्यावर राहुल यांनी हे ट्विट केलं. मात्र मतदान संपल्यानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोल्स मध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ आहे असं दाखवल्यानं  सोशल मीडियावर लोकांनी काँग्रेसला ट्रोल केलंय.


मध्यप्रदेशात EVM मध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावरून राहुल गांधींनी निशाना साधलाय. पंतप्रधान मोदींच्या राज्यात EVM मशिन्समध्ये गुढ शक्ती आल्या आहेत. काही मशिन्स गाडी घेऊन पळून गेल्या. काही मशिन्स हॉटेल्समध्ये ड्रिंक्स करताना सापडल्या असा उपरोधीक टोला त्यांनी लगावला होता.


मात्र त्यांच्या या ट्विटनंतर एक्झिट पोल्स आलेत आणि त्यात काँग्रेस सत्तेच्या जवळ जात असल्याचं दाखवण्यात आलंय. त्याचा संदर्भ देऊन लोकांनी राहुल गांधींना सवाल केलेत. आता तरी तुमचा EVM मशिन्सवर विश्वास बसणार आहे का असा सवाल लोकांनी राहुल यांना केला.

Loading...


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...