#BattleOf2019 : कोणत्या राज्यात केव्हा होणार निवडणूक?

#BattleOf2019 : कोणत्या राज्यात केव्हा होणार निवडणूक?

महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मार्च : निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. 11 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान सतराव्या लोकसभा निवडणुकीकरता मतदार होणार आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणूक

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार.

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान.

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान.

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान.

पहिल्या टप्प्यात 22 राज्यांमध्ये मतदान

आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालया, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगना, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान निकोबार, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, लक्षद्वीप, पाँडचरी आणि छत्तीसगडमध्ये एका टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.

कर्नाटक, मनीपूर, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

आसाम आणि छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिसामध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदार होणार असून बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहे.

First published: March 10, 2019, 6:08 PM IST

ताज्या बातम्या