Home /News /national /

Lockdownमुळे दोन महिने घर होतं बंद, दार उघडताच त्या दोघांना पाहून मालक हादरला

Lockdownमुळे दोन महिने घर होतं बंद, दार उघडताच त्या दोघांना पाहून मालक हादरला

Mumbai: Residents of Khar during a fumigation drive to prevent the spread of coronavirus during the nationwide lockdown, in Mumbai, Monday, April 6, 2020. (PTI Photo)(PTI06-04-2020_000148B)

Mumbai: Residents of Khar during a fumigation drive to prevent the spread of coronavirus during the nationwide lockdown, in Mumbai, Monday, April 6, 2020. (PTI Photo)(PTI06-04-2020_000148B)

दोन महिन्यानंतर जेव्हा अनलॉकची सुरुवात झाली तेव्हा मुरूगन आपलं घर बघण्यासाठी आले. ते जेव्हा घरासमोर आले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

    चेन्नई 8 जुलै: कोरोनामुळे देशभर दोन महिन्यांचा कडक लॉकडाऊन होता. या काळात जवळपास सर्वच व्यवहार ठप्प होते. शहरांमधून लाखो मजुरांनी गावाकडे स्थलांतर केलं होतं. या मजुरांचे प्रचंड हाल झाले. कोरोनाच्या भीतीमुळे आपलं शहरातं घर बंद करून दोन महिने गावाकडे गेलेल्या एका घर मालकाला परत आल्यानंतर धक्कादायक प्रकार आढळून आला. त्याच्या घरावर एका तरुण जोडप्यानं ताबा मिळवल्याचं त्याला लक्षात आलं. तामिळनाडूच्या रामनाथपुरम् जिल्ह्यात ही घटना घडली असून आता घर मालकावरच बेघर होण्याची वेळ आली आहे. रामनाथपुरम् जिल्ह्यातल्या एका शहरात मुरूगन हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. मात्र राज्यात कोरोनाची साथ वाढत असल्याने त्यांनी आल्याजवळच्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. दोन महिने ते आपल्या गावी शेती आणि इतर कामे करत होते. तिथे त्यांचं लहानसं किराणा दुकानही आहे. दोन महिन्यानंतर जेव्हा अनलॉकची सुरुवात झाली तेव्हा मुरूगन आपलं घर बघण्यासाठी आले. ते जेव्हा घरसमोर आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. गावातल्याच एका तरुण जोडप्याने त्यांचं ते घर बळकावलं होतं. मुरुगन यांनी त्यांना जेव्हा जाब विचारला तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिलं. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही इथून हलणार नाही असंही त्यांनी सांगितलं. ...तर भारतात दररोज सापडणार 2.87 लाख नवे COVID-19 रुग्ण, MITचा धक्कादायक रिपोर्ट लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, व्यवसाय बंद झाल्याने आपण बेघर झालो आहोत. हे घर अनेक दिवसांपासून बंद असल्याने आम्ही अंगणात राहत आहोत असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे मुरुगन यांना आता आपल्याच घरात बेघर होण्याची वेळ आली असून त्या घुसखोर दाम्पत्याला घराबाहेर कसं काढायचं असा प्रश्न पडला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या