अतिरेक्यांना गोळ्या घालायला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची काय? - मोदी

अतिरेक्यांना गोळ्या घालायला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची काय? - मोदी

'राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा राष्ट्रीय असून त्यावर चर्चा ही झालीच पाहिजे. हा काही नगरपालिकेची निवडणूक नाही.'

  • Share this:

कुशीनगर (उत्तर प्रदेश) 12 मे : लोकसभेच्या निवडणुकीचा आता फक्त एक टप्पा शिल्लक राहिला आहे. शेवटचं मतदान 19 मे रोजी होणार आहे. रविवारी 6व्या टप्प्यातलं मतदान झालं. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधीपक्षांवर निशाणा साधलाय. सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाईवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. आम्ही कारवाईसाठी काय निवडणूक आयोगाला परवानगी माघायची काय असा सवाल त्यांनी केला.

मोदी म्हणाले, सरकार दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत असताना विरोधी पक्ष विचारतात की निवडणुका असल्यामुळेच सरकार कारवाई करत आहे. सरकार असे निर्णय कधीच निवडणुका पाहून घेत नाही. देशहित सर्वोच्च स्थानी असतं. अतिरेक्यांना ठार करायला काय निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला केला.

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा राष्ट्रीय मुद्दा असून त्यावर चर्चा ही झालीच पाहिजे. हा काही नगरपालिकेची निवडणूक नाही. मात्र सुरक्षेच्या संदर्भात काँग्रेसची पाटी कोरच असल्याने त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासारखं काहीच नाही असंही ते म्हणाले.

मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करणार

देशात सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सहकारी, मित्र पक्षांना एकत्र घेत सरकार चालवण्याचा अनुभव भाजपला आहे.  मी यापूर्वी पक्षाच्या कामासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये इतर पक्षासोबत काम केलं आहे. शिवाय, आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या काळात मित्र पक्षांसोबत यशस्वीपणे सरकार चालवलं गेलं होतं. असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

2014 प्रमाणे यश मिळेल

यावेळी भाजपसह मित्रपक्षांना 2014 प्रमाणे यश मिळेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसंच मित्रपक्षांची कामगिरी देखील दमदार असेल अशी प्रतिक्रिया देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यापूर्वी देखील इतर पक्षांसाठी मैत्रिचे दरवाजे उघडे असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

देशाच्या विकासासाठी मित्रपक्षांना एकत्र घेत कशा पद्धतीनं सरकार चालवायचं याचा वारसा भाजपला अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून मिळालेला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावरून तर्क - वितर्कांना सुरूवात झाली आहे.

First published: May 12, 2019, 5:34 PM IST

ताज्या बातम्या