कर्नाटकमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं, अमित शहा आणि सिद्धरामय्या दोघंही मैसूरमध्ये

कर्नाटकमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं, अमित शहा आणि  सिद्धरामय्या दोघंही मैसूरमध्ये

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सभा आज एकाच शहरात मैसूरमध्ये होत आहेत. आपण मैसूरमधल्या चामुंडेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.

  • Share this:

30 मार्च : कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सभा आज एकाच शहरात मैसूरमध्ये होत आहेत. आपण मैसूरमधल्या चामुंडेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.

सध्या सिद्धरामय्या पाच दिवसांच्या मैसून दौऱ्यावर आहेत. तर आपल्या मैसूरच्या सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा हे लिंगायत आणि दलितांच्या मुद्द्याला हात घालतील असा अंदाज आहे. पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका पहाता कॉंग्रेससाठी ही निवडणूक फारच महत्त्वाची ठरणार आहे. कारण मोठ्या राज्यांपैकी फक्त कर्नाटकमध्येच कॉंग्रेसच सरकार आहे तर इतर बहुतेक सर्वच ठिकाणी भाजपनं कॉंग्रेसवर मात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2018 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...