मराठी बातम्या /बातम्या /देश /

COVID-19: स्मशानभूमीत जाताच पुरुषाच्या पार्थिवाची झाली महिला, उडाली खळबळ

COVID-19: स्मशानभूमीत जाताच पुरुषाच्या पार्थिवाची झाली महिला, उडाली खळबळ

स्मशानभूमीत गेल्यानंतर जेव्हा हा स्त्रीचा मृतदेह असल्याचं समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला.

स्मशानभूमीत गेल्यानंतर जेव्हा हा स्त्रीचा मृतदेह असल्याचं समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला.

स्मशानभूमीत गेल्यानंतर जेव्हा हा स्त्रीचा मृतदेह असल्याचं समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला.

    रांची 6 सप्टेंबर: कोरोनाच्या संक्रमणाने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. तर रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. झारखंडमधल्या एका घटनेने तर प्रचंड खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पार्थिव जेव्हा स्मशानभूमीत नेलं गेलं तेव्हा ते पार्थिव महिलेचं आढळलं त्यामुळे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याचं झालं असं की रांचीच्या एका हॉस्पिटलमध्ये दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात एक पुरुष तर दुसरी स्त्री रुग्ण होती. हॉस्पिटलच्या गचाळ कारभारामुळे नातेवाईकांना मृतदेह सोपवितांना त्यांची अदलाबदल झाली. स्त्री रुग्णाच्या नातेवाईकांना पुरुषाचा तर पुरुष रुग्णांच्या नातेवाईकांना स्त्री रुग्णाचा मृतदेह सोपविण्यात आला. स्मशानभूमीत गेल्यानंतर जेव्हा हा स्त्रीचा मृतदेह असल्याचं समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर तो मृतदेह पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. हॉस्पिटलने अदलाबदल झाल्याचं मान्य करत नातेवाईकांनाच दोषी ठरवलं. मृतदेह सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ न देताच नातेवाईकांनी तोडफोड करून पार्थिव ताब्यात घेतल्याचं स्पष्टीकरण हॉस्पिटलने दिलं आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिल्याने हॉस्पिटल प्रशासनाचं पीतळ उघडं पडलं आहे. CM उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी, मातोश्रीवर आला दाऊदच्या नावाने फोन दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज 80 हजारांच्या जवळपास नवे रुग्ण आढऴून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारी देशात 83 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून 1 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 67 हजारांपेक्षा जास्त जण बरे झालेत. या वाढत जाणाऱ्या रुग्णांमुळे भारताने आता ब्राझीलला मागे टाकला असून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता भारतापुढे फक्त अमेरिकेचा क्रमांक लागतो. कोरोना व्हायरसवर अजुनही औषध मिळालेलं नाही. त्यावर संशोधन सुरु आहे. मात्र कोरोना व्हायरस पसरण्याचं एक नवं कारण समोर आलं आहे. 2,212 हजारांची फसवणूक पडली 55 लाखांना, लबाड मॅनेजरला कोर्टाचा दणका! तर 70, 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या