Elec-widget

घाटातून हवेत उडालेली कार थेट घराच्या छतावर जाऊन थांबली!

घाटातून हवेत उडालेली कार थेट घराच्या छतावर जाऊन थांबली!

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यामधल्या कार अपघाताचा हा फोटो पहा. हा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

  • Share this:

04 मार्च : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यामधल्या कार अपघाताचा हा फोटो पहा. हा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. रस्त्यावर झालेल्या अपघातातली कार थेट घरावर जाऊन कशी पडेल? या प्रश्नानं थोडं चक्रवायला होतं. पण हे खरं आहे.

हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सरकाघाट आहे. तशी या घाटाशी अवस्था बिकट झाली आहे. पण हा रहदारीचा घाट आहे. या घाटातून जाणाऱ्या एका कारचा भिषण अपघात झाला. घाटातून वळण घेताना गाडी चालकाचा तोल सुटला आणि कारने वेग धरला. दरम्यान, या गाडीने इतका वेग धरला की ती थेट घाटाच्या कठड्यावरून हवेत उडाली आणि घाटाच्या बाजूला असलेल्या घराच्या छतावर जाऊन आदळली.

घाट आणि घराच्या छतात किमान 8 फूट इतकं अंतर आहे. सुदैवाने घराच्या छतावर असलेल्या पत्राच्या घराला धडकून ही कार थांबली नाहीतर याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

या अपघातात कार आणि कार चालक दोन्हीही सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण या अपघातामुळे सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2018 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...