भीषण अपघातात प्रवासी सुखरूप, थरार सीसीटीव्हीत कैद

तुफान वेगात असलेल्या या कारचा कंट्रोल कदाचित सुटला असावा. गाडी खांबाला आदळून चक्क उलटी झाली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2018 02:00 PM IST

भीषण अपघातात प्रवासी सुखरूप, थरार सीसीटीव्हीत कैद

मोरबी, 05 मार्च : देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. त्याचाच प्रत्यय गुजरातमधल्या मोरबीचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ पाहून येतो. मोरबीत तुफान वेगाने जाणारी ही गाडी तितक्याच वेगात एका खांबाला आदळली.

नजर खिळवून ठेवणाऱ्या या दृश्यात खरं आश्चर्य तर पुढेच आहे . गाडीत बसलेले दोघेजण सुखरूप बाहेर आले विशेष म्हणजे त्यांना साधं खरचटलं देखील नाही. नशीब बलवत्तर यालाच म्हणतात हे नक्की.

तुफान वेगात असलेल्या या कारचा कंट्रोल कदाचित सुटला असावा. गाडी खांबाला आदळून चक्क उलटी झाली. आणि आतले दोघे जण शिताफीनं कारबाहेर आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close