S M L

डोंबिवलीतल्या एकाच कुटुंबातील 11 जणांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

डोंबिवलीच्या संगितावाडीमधील गोविंद धाम सोसायटीतील हितेश शहा त्यांच्या कुटुंबीयांसह गुजरातला जीपने देवदर्शनाला गेले होते. ते जीपने भावनगर येथील पालिताना मंदिरात दर्शनाला जात होते. यावेळी धुका-बरवाला रस्त्यावर अचानक जीपच्या समोर ट्रक आल्याने ट्रक आणि जीपची जोरदार धडक झाली.

Sonali Deshpande | Updated On: Aug 27, 2017 01:55 PM IST

डोंबिवलीतल्या एकाच कुटुंबातील 11 जणांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

 27 आॅगस्ट : गुजरातमधल्या धंधुका-बरवाडा महामार्गावरच्या एका भीषण अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.  हे सर्व जण एकाच परिवारातले आहेत. डोंबिवलीतल्या शहा परिवारातले हे कुटुंबीय आहेत. यात 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. अपघातात 14 वर्षांचा एक मुलगा वाचला आहे. जीप आणि ट्रकमध्ये ही भीषण धडक झाली.

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण डोंबिवलीतील  रहिवासी आहेत,  प्राथमिक वृत्तानुसार, डोंबिवलीच्या संगितावाडीमधील गोविंद धाम सोसायटीतील हितेश शहा त्यांच्या कुटुंबीयांसह गुजरातला जीपने देवदर्शनाला गेले होते. ते जीपने भावनगर येथील पालिताना मंदिरात दर्शनाला जात होते. यावेळी धुका-बरवाला रस्त्यावर अचानक जीपच्या समोर  ट्रक आल्याने ट्रक आणि जीपची जोरदार धडक झाली आणि या धडकेत जीपमधील 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र हितेन शहा यांची 80 वर्षाची आई या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2017 01:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close