या काळात करा गुंतवणूक आणि व्हा मालामाल!

या काळात करा गुंतवणूक आणि व्हा मालामाल!

निवडणूकीच्या काळात अर्थव्यवस्थेचा वेग वाढत असतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी निवडूकांचा काळ म्हणजे एक सुवर्ण संधीच!

  • Share this:

11 मार्च,नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात निवडणूका म्हणजे लोकशाहीचा उत्सवच असतो.  कालपासून संपूर्ण देशभरात 17 व्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकमेंकाविरूध्द आरोप-प्रत्यारोप, शह-काटशह, फोडाफोडीच्या राजकारणाला आता सुरुवात होईल, म्हणजेच काय तर हळू-हळू लोकसभा निवडणूकांचा रंग संपूर्ण देशाला चढेल.

महिंद्रा म्युच्युअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असलेले आयुतोष बिश्नोई यांच्या मतानूसार, 'निवडणूक काळात अर्थव्यवस्थेत प्रचंड प्रमाणात रोख व्यवहार होत असतात, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. त्यामुळे ज्यांना गुंतवणुकीतून पैसा कमावायचा आहे अशांना निवडणुकांचा काळ म्हणजे एक सुवर्ण संधीच!'

बिश्नोई म्हणाले की, नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली होती. अचानक झालेल्या नोटबंदीमुळे लोकांकडे पैशांची प्रचंड मोठी चणचण होती. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पण आता परिस्थिती सुधारली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील बदल पाहता आपल्याला कळेल की, अनेक क्षेत्रांतील व्यवहार वाढला आहे त्यामुळे आपोआपच नफ्यातही वाढ झालेली आहे.

ते पुढे म्हणाले की, ' यंदाच्या बजेटमुळे लोकांना जास्तीत जास्त व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देईल, त्यामुळे लोकांची मागणी वाढत जाईल आणि कंपन्यांचा नफा देखील वाढतील. दुसरीकडे, कंपन्यांची किंमत कमी होत आहे. तेलांच्या किंमती खाली आल्या आहेत, स्टील-तांबेसारख्या औद्योगिक वस्तूंच्या किंमतींनी आतापर्यंतचा निचांक गाठला आहे. अशा परिस्थितीत, कंपन्यांचा खर्च कमी होईल आणि नफा वाढेल. म्हणून, चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अगदी योग्य आहे. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने निवडणुकीत गुंतवणूक करण्याच्या संधीचा फायदा घेतला पाहिजे.'

गुंतवणूक कुठे कराल?

आयुतोष यांच्या मते,'पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणजेच SIP मध्ये गुंतवणूक करणं खुप फायदेशीर ठरेल. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला SIP मध्ये गुंतवणूक करत आहात आणि जर तुमच्याकडे आणखी थोडे पैसे असतील तर तुम्ही दोन SIP मध्ये गुंतवणूक करा. कारण आपण डेट मार्केट्स, फिक्स्ड इनकम फंड्स यांचा विचार केला, तर त्यांचे दर खाली जात आहेत. दर कमी होणे म्हणजे आपल्या निधीचे मूल्य वाढत आहे. हे चक्र चालूच राहील.'

ते म्हणाले,'येणाऱ्या 6-8 महिन्यात दरात वाढ होण्यापेक्षा दर कमी होण्याची शक्यता खुप जास्त आहे. गेल्या एक-दोन वर्षांच्या कॉर्पोरेट फंडमधील परतावा  11-12 टक्के इतका आहे. लिक्विड फंडांना 7.25-7.5 टक्क्यांचा परतावा मिळत आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करण्यात अजिबात धोका नाही. म्हणून, अनुभवी गुंतवणूकदार SIP मधील गुंतवणूकीला जास्त प्राधान्य देतात.

गुंतवणूक करताना या तीन बाबींकडे लक्ष द्या-

1)गुंतवणूक करणाऱ्या कंपनीचा व्यवसाय किती मोठा आहे?- यासाठी आपल्याला त्या कंपनीच्या मागील काही वर्षांची बॅलन्सशीट पहावी लागेल.

2)बाजारात कंपनीचं स्थान काय?

कंपनीचा व्यवसाय चांगला असेल तर अशा कंपनीत गुंतवणूक करायला काही हरकत नाही. कारण प्रत्येक वेळी कंपनीचं बाजारात स्थान मोठं असणं गरजेचं नाही. अनेकवेळा कंपनीला फायदा होत नसतो पण बाजारात कंपनीच चांगलं स्थान असतं. त्यामुळे गुंतवणुकीला आपल्याला एक अशी कंपनी शोधायला हवी की ज्या कंपनीचा व्यवसाय आणि बाजारातील स्थान चांगलं असेल.

3)गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती-

चांगला फायदा होण्यासाठी योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचे असते. यासाठी आपल्याला बाजारपेठेचा अंदाज घेत रहावं लागेल. कोणते मोठे गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करताहेत. आपली ही गुंतवणूक तोट्यात तर जाणार नाही याचंही आपल्याला तांत्रिक विश्लेषण करावं लागेल.

First published: March 11, 2019, 9:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading