नवी दिल्ली, 19 जानेवारी : मुलगा हवा असण्याच्या हट्टापायी टोकाचं पाऊल उचललं गेल्याच्या घटना आपण आजच्या आधुनिक काळातही पाहतो. आता पती-पत्नीच्या प्रेमळ नात्यालाच या कारणानं तडा गेल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत(Delhi) हे प्रकरण घडलं आहे. इथं एका जोडप्यानं (couple) 23 वर्षांचा संसार केला. आणि एके दिवशी अचानक पतीनं (husband) पत्नीकडे (wife) घटस्फोटाची मागणी केली. आणि लगोलग ट्रिपल तलाक (triple talaq) पद्धतीनं कथित घटस्फोट (divorce) मिळवलासुद्धा. यामागं कारण होतं मुलगा नसल्याचं.
या धक्कादायक प्रकरणात पीडित महिलेचं (victim woman) नाव आहे हुमा हाशिम. आता हुमानं न्यायालयाचा (court) दरवाजा ठोठावला आहे. हुमाचं लग्न (marriage) दिल्लीत एका कारखान्याचा मालक असलेल्या दानिशसोबत 23 वर्षांपूर्वी झालं होतं. दोघांना एक 20 वर्षांची आणि दुसरी 18 वर्षांची अशा मुली आहेत. मात्र आता अचानकच टोकाचं पाऊल तिच्या नवऱ्यानं उचललं आहे.
He always wanted a son & made me undergo several abortions. He was hitting my daughter one day. When I tried to save her, he kicked & spat on me. He gave me triple talaq. We tried to file a complaint but Police paid no heed. We asked for allowance but he gave nothing: Huma Hashim https://t.co/0cEE5v1w35 pic.twitter.com/80K3cM3UJo
— ANI (@ANI) January 19, 2021
दानिशनं ट्रिपल तलाक देत हुमाला दोन मुलींसह घराबाहेर काढलं आहे. हुमा सांगते, की दानिशला कायमच एक मुलगा पाहिजे होता. त्यासाठी त्यानं अनेकदा मला गर्भपातही (abortion) करायला लावला. एकदा तो माझ्या मुलीला मारत होता. मी वाचवायला मध्ये पडले तेव्हा त्यानं मला लाथ मारली. आणि अंगावर थुंकलासुद्धा. लगोलग त्यानं मला ट्रिपल तलाक दिला.
हुमा म्हणते, की तिनं तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अजिबातच लक्ष दिलं नाही. मी पोटगीची मागणी केल्यावरही त्यानं दाद दिली नाही. हुमाच्या सांगण्यानुसार 13 जुलैला तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी साधी एफआयआरही केली नाही. आता हुमा आणि तिच्या मुली राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेल्या आहेत.