मराठी बातम्या /बातम्या /देश /चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून तब्बल 40 हजार लोकांची फसवणूक, अशी केली जायची लूट

चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून तब्बल 40 हजार लोकांची फसवणूक, अशी केली जायची लूट

सायबर साक्षरता वाढवणं ही काळाची गरज आहे. लोकांच्या भयानक आर्थिक फसवणुकीचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे.

सायबर साक्षरता वाढवणं ही काळाची गरज आहे. लोकांच्या भयानक आर्थिक फसवणुकीचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे.

सायबर साक्षरता वाढवणं ही काळाची गरज आहे. लोकांच्या भयानक आर्थिक फसवणुकीचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे.

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तंत्रज्ञानाच्या जगात ऑनलाईन फ्रॉड्सना (online frauds) तोटा नाही. अनेक लोकांची उपजीविका असे फ्रॉड्स करत पैसे कमावण्यावर चालते. असाच एक प्रकार आता दिल्लीत (Delhi) उघडकीला आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं (cyber cell) दोन चीनी महिलांसह (Chinese women) 12 लोकांना जेरबंद केलं आहे. या सगळ्यांनी अ‍ॅप्सच्या माध्यमातून जवळपास 40 हजार लोकांची फसवणूक केली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ते लोकांना एक आकर्षक मार्केटिंग स्कीम सांगायचे. या स्कीममध्ये मालवेअर (malware) असायचा.

नवभारत टाइम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. डीसीपी अन्येष राय यांच्या मते, या लोकांनी दोन महिन्यात 40 हजार लोकांना लुटलं आहे. अटक केलेल्यांमध्ये 27 वर्षांची चाओहाँग डेंग आणि 54 वर्षांची वू जियाझी या दोघी आहेत. दोघी चीनच्या (china) सिन्हुआ प्रांतात राहतात. अटक झालेल्या लोकांकडून जवळपास 25 लाखांची रोकड जप्त केली आहे. याव्यतिरिक्त 4.75 कोटी रुपये विविध बँक खात्यांमध्ये ब्लॉक केले गेले आहेत. या प्रकरणात आता अजून काही लोकांनाही अटक होणार आहे.

या प्रकारात हे लोक आधी फोन करून एक अ‍ॅप (app) डाउनलोड करायला सांगायचे. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या (whatsapp message) माध्यमातून लोकांमध्ये एक लिंक (link) पाठवली जायची. या मेसेजमध्ये एन्क्रिप्टेड शॉर्ट युआरएल असायचा. यामाध्यमातून newworld.apk हे अ‍ॅप डाउनलोड व्हायचं. डीसीपी रॉय यांच्या सांगण्यानुसार फॉरेन्सिक टीमनं चेक करून सांगितलं, की हे एक मालवेअर आहे. या अ‍ॅपवर रोज 30 मिनिट घालवणाऱ्या व्यक्तीला 3000 रुपये कमिशन रोज मिळेल अशी ऑफर दिली जायची. फेसबुक, इन्स्टा (Instagram) अशा ठिकाणी सेलिब्रिटीजना प्रमोट करण्याचं हे काम असेल असं सांगितलं जायचं. सुरुवातीला युजरच्या अकाउंटमध्ये 6 रुपये टाकले जायचे. मग त्याला वीआयपी अकाउंट (VIP account) उघडून देण्यासाठी अधिक पैसे मागितले जायचे.

हे अ‍ॅप युजरच्या फोनमधून बँक अकाऊंटची (bank account) माहितीही चोरत होतं. या अ‍ॅप आणि वेबसाईटचे अ‍ॅड्रेस चिनी कंपन्यांचे असल्याचं समोर आलं आहे. फ्रॉडमधून कमावलेले पैसे विविध अकाउंट्समध्ये टाकले जायचे.

First published:

Tags: Bank, Instagram