Home /News /national /

सुसाट...! 10वीच्या विद्यार्थ्याने भंगारातून बनवली बाईक, 80 किमीचा आहे Average

सुसाट...! 10वीच्या विद्यार्थ्याने भंगारातून बनवली बाईक, 80 किमीचा आहे Average

त्याच्या मित्रांनाही बाईक खूप आवडली असून ते गौरवचे आता फॅनच झाले आहेत.

    चंडीगढ 03 सप्टेंबर:  इच्छा असले तर काहीही होऊ शकतं असं म्हणतात. याचं उदाहरण चंदिगडच्या एका मुलाने घालून दिलंय. इंजिनियरिंगची आवड असलेल्या या मुलाने भंगारातल्या सामानामधून बाईक तयार केली. गौरव असं या मुलाचं नाव असून तो सध्या 10वीमध्ये आहे. त्याच्या या कामाचं सगळ्याच स्तरातून कौतुक होत असून त्याला आणखी अत्याधुनिक अशा बाईक्स तयार करायच्या आहेत. गौरवने तीन वर्षांपूर्वी सायकलपासून ईलेक्ट्रीक बाईक तयार केली होती. मात्र त्याचा वेग कमी असल्याने त्याने बाईक तयार करण्याचा निर्णय घेतला. नंतर सुरु झाली त्याची जोडणी. थोड्याच बजेटमध्ये त्याला बाईक तयार करायची होती. त्यामुळे त्याने सगळ्या जुन्या सामानाचा वापर करत ही बाईक तयार केलीय. ही बाईक पेट्रोलवर चालणारी असून गाडीचा Average हा एका किलोमीटरसाठी 80 किमी एवढा आहे. गैरवला आणखी अत्याधुनिक अशा बाईक्स तयार करण्याची इच्छा आहे. त्याच्या त्याच्या कुटुंबीयांचीही पूर्ण मदत मिळत असते. त्याच्या मित्रांनाही  बाईक खूप आवडली असून ते गौरवचे आता फॅनच झाले आहेत. पुढे इंजिनिअरिंग करून याच क्षेत्रात काम करण्याची त्याची इच्छा आहे. देशात सध्या ईलेक्ट्रीक बाईकची धूम असून नव नव्या गाड्या बाजारात येत आहेत. गौरवलाही पुढे जाऊन ईलेक्ट्रीक बाईक तयार करण्याची इच्छा आहे. मात्र त्यासाठी लागणारं कौशल्य आणि पैसे त्याच्याकडे सध्याच नाहीत. त्यामुळे तो आता त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Petrol

    पुढील बातम्या