Home /News /national /

कॅबिनेटच्या बैठकीतूनही मोदींनी दिले सोशल डिस्टन्सिंगचे धडे, आता तरी घराबाहेर पडू नका

कॅबिनेटच्या बैठकीतूनही मोदींनी दिले सोशल डिस्टन्सिंगचे धडे, आता तरी घराबाहेर पडू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे धडे देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीतील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

    नवी दिल्ली, 25 मार्च : देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेटची बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे दृश्य देखील पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून वारंवार लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आव्हान देत आहेत, तेच या बैठकीतही पाहायला मिळाले. कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्व मंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे सूत्र स्वीकारल्याचे दिसत होते. त्यांची बैठकीची रचनाही तशीच करण्यात आली होती. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने जाहीर केलेल्या व्हिडीओमध्ये सोशल डिस्टन्सिंगची पाहायला मिळाले. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि अन्य मंत्री यांच्या खुर्चीत बरंच अतंर आहे. येथे हे चित्र अधिक प्रासंगिक बनले आहे, कारण पंतप्रधान मोदी वारंवार लोकांना घर सोडून बाहेर पडून नका आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवण्यास सांगत आहेत. संबंधित - आयसोलेशन वॉर्डमधील भीतीदायक 12 दिवस, कोरोनाची लढाई जिंकलेला रुग्ण म्हणाला... मंगळवारी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'जगातील कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही आणि आपल्याला स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि जर आपल्याला त्या संसर्गाचे चक्र खंडित करायचे असेल तर आपण सोशल डिस्टन्सिंगचे सूत्र स्वीकारायला हवं.'
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या