#Budget2018 : गरिबांना माफक दरात आरोग्य सुविधा

#Budget2018 : गरिबांना माफक दरात आरोग्य सुविधा

अर्थमंत्री अरूण जेटलींनी 2018 च्या बजेटमधून जगातलं सगळ्यात मोठं आरोग्य धोरण जाहीर केलंय. या आरोग्य धोरणामुळे देशातील गरिबांना अगदी माफक दरात आरोग्य सुविधा मिळणार आहे.

  • Share this:

01 फेब्रुवारी :  अर्थमंत्री अरूण जेटलींनी 2018 च्या बजेटमधून जगातलं सगळ्यात मोठं आरोग्य धोरण जाहीर केलंय. या आरोग्य धोरणामुळे देशातील गरिबांना अगदी माफक दरात आरोग्य सुविधा मिळणार आहे.

सरकारच्या नव्या आरोग्य धोरणानुसार आरोग्यासाठी कोणत्या योजना?

१० कोटी कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च करणार

आरोग्य सुविधांसाठी 'आयुषमान भारत' कार्यक्रम

आरोग्यासाठी १.५ लाख कोटीची तरतूद

आरोग्य सुधारणा केंद्र उभारण्यासाठी १२०० कोटी

टीबी रोखण्यासाठी 600 कोटींची तरतूद

24 नवे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभारणार

सरकारच्या या महत्त्वाकांक्षी आरोग्य धोरणाचा देशातील तब्बल 50 कोटी लोकांना फायदा होणार आहे. सरकारच्या या योजनांचं सर्वसामान्यांनीही स्वागत केलंय.

गरिबांना श्रीमंतांच्या रोगानं गाठलं तर गरीब दवा कमी खातात आणि दवाखाना त्यांना जास्त खातो असं म्हणतात. अशा वेळी त्यांना माफक दरात दवा मिळाली तर सरकारला नक्की दुवा मिळेल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2018 03:36 PM IST

ताज्या बातम्या