नवी दिल्ली 04 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार नसल्याचं पक्षाने ठरविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
LJP हा NDAमधून बाहेर पडला तरीही त्या पक्षाने भाजपची साथ सोडलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपशी संबंध कायम राहणार असल्याचं पासवान यांच्यावतीने सांगण्यात आलं आहे. पासवान यांनी राज्यात भाजप आणि लोकजनशक्तीचं सरकार आणू असंही म्हटलं आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून जेडीयू आणि पासवान यांच्या पक्षात मतभेद झाल्याने पासवान यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यात जास्त जागांची मागणी केली होती. तर नितिश कुमार हे तेवढ्या जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे पासवान यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्री पासवान हे आजारी आहेत. त्यामुळे पक्षाची सर्व सूत्र ही चिराग यांच्याकडे आहेत.
Delhi: Lok Janshakti Party (LJP)'s chief Chirag Paswan shows victory sign after the party's Central Parliamentary Board meeting.
Lok Janshakti Party (LJP) will not contest the upcoming #BiharElections with Janata Dal (United). pic.twitter.com/puvwFu0HjD
— ANI (@ANI) October 4, 2020
LJP आता स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे राज्यातल्या राजकारणाची समिकरणे बदलणार आहे. बिहारमध्ये भाजपचे प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आता नितीश कुमार आणि पासवान या दोनही नेत्यांसोबत समन्वयाची भूमिका घ्यावी लागणार आहे.