मराठी बातम्या /बातम्या /देश /अजब प्रकार! पत्नीच्या माहेरच्यांनी लग्नात दिलेलं साहित्य घेण्यास पतीचा नकार; पत्नीचा नांदण्यास नकार

अजब प्रकार! पत्नीच्या माहेरच्यांनी लग्नात दिलेलं साहित्य घेण्यास पतीचा नकार; पत्नीचा नांदण्यास नकार

लग्नात(wedding) नवरीच्या माहेरकडील मंडळींनी आहेरामध्ये दिलेलं संसारोपयोगी साहित्य घेण्यास नवरदेवाने नकार दिल्याने नवरी रुसली असल्याचा अजब प्रकार समोर.

लग्नात(wedding) नवरीच्या माहेरकडील मंडळींनी आहेरामध्ये दिलेलं संसारोपयोगी साहित्य घेण्यास नवरदेवाने नकार दिल्याने नवरी रुसली असल्याचा अजब प्रकार समोर.

लग्नात(wedding) नवरीच्या माहेरकडील मंडळींनी आहेरामध्ये दिलेलं संसारोपयोगी साहित्य घेण्यास नवरदेवाने नकार दिल्याने नवरी रुसली असल्याचा अजब प्रकार समोर.

भोपाळ, 1 डिसेंबर: लग्न ( marriage) करताना मुलीच्या वडिलांकडे हुंडा मागितला गेल्याचे अनेक प्रकार समोर येतात. लग्न झाल्यानंतरदेखील नवऱ्याकडची मंडळी नवरीला तिच्या माहेरून पैसे आणण्यासाठी सांगतात. तसंच पत्नीने माहेरून पैसे आणावेत, यासाठी तिचा छळ (harassed) केल्याचे प्रकारदेखील समोर येतात. मात्र मध्य प्रदेशात भोपाळमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. लग्नात नवरीच्या माहेरकडील मंडळींनी आहेरामध्ये दिलेलं संसारोपयोगी साहित्य घेण्यास नवरदेवाने नकार दिला आणि त्याहून पुढची गोष्ट म्हणजे त्यामुळे नवरी रुसली आणि तीन महिने झाले तरी ती माहेरीच राहिली आहे. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आत्तापर्यंत महिलांकडून हुंड्यासाठी छळ झाल्याच्या केसेस ( cases) पाहिल्या असतील. पण हे प्रकरण वेगळंच आहे. या महिलेच्या पतीने तिच्या माहेरच्या मंडळींकडून दिलेलं साहित्य अजून घेतलेलं नाही. लग्नात ( wedding) तिच्या माहेरच्या मंडळींनी तिला कारसह संसारोपयोगी साहित्य दिलं. पण हे साहित्य तिच्या पतीने न घेतल्याने महिलेला राग आला व ही महिला तीन महिन्यांपासून माहेरी आहे. पत्नीचं मन वळवण्यासाठी पतीने आता न्यायालयात (court) धाव घेतली आहे. पत्नीला घरी बोलावण्यासाठी पतीने न्यायालयात हिंदू विवाह कायद्याच्या ( Hindu Marriage Act) कलम 9 अन्वये युक्तिवाद केला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

पतीने सांगितलं, की 'लग्नानंतर पत्नीच्या माहेरच्यांनी संसारोपयोगी साहित्य दिले होते. हे साहित्य घेण्यास मी नकार दिल्याने हे साहित्य पत्नीच्या माहेरी एका खोलीत ठेवले आहे. लग्नात दिलेली गाडीही घराबाहेर उभी आहे. माझ्या पत्नीला तीन भाऊ आहेत. आता भाऊ बहिणीवर तिच्या लग्नात दिलेलं साहित्य सासरी घेऊन जावं, यासाठी दबाव टाकू लागले आहेत. पण माझ्या घरात वस्तू ठेवायला जागा नाही. मी ही गोष्ट पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती रागात असून काही ऐकण्याच्या तयारीत नाही.'

दुसरीकडे पत्नी व तिच्या माहेरच्या मंडळींचं म्हणणं आहे, की आम्ही जावयाला हुंडा म्हणून हे संसारोपयोगी साहित्य आणि कार दिलेली नाही. आम्हाला एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नात संसारोपयोगी सर्व वस्तू मुलीला देण्याची आमची इच्छा होती. आमच्याकडे आमच्या जावयाने कधीही हुंड्याची मागणी केली नाही. तसंच आम्हीही हुंड्याबाबत काहीही बोललो नाही. अखेर समुपदेशनानंतर हे प्रकरण मिटण्याच्या बेतात आहे.

या प्रकरणी न्यायालयात तक्रार आल्यानंतर पती व पत्नीचे समुपदेशन केले जात आहे. समुपदेशकाने पतीला समजावून सांगितलं, की 'महिलेच्या माहेरच्या घरातून मिळणारे संसारोपयोगी साहित्य हा हुंडा अजिबात समजू नये. तुम्ही कोणतीही मागणी केलेली नाही. पत्नीच्या माहेरची मंडळी त्यांच्या मुलीला वस्तू देत आहेत. ही सर्व तुमच्या पत्नीची संपत्ती, स्त्रीधन आहे. त्यामुळे तिला यापासून वंचित ठेवू नका.'

या जोडप्याचा विवाह 14 फेब्रुवारी 2021 रोजी झाला होता. लग्नाच्या पारंपरिक विधींचा भाग म्हणून पतीने प्रतिकात्मक एक रुपया वरदक्षिणा घेतली. तो हुंड्याच्या विरोधात होता. यानंतरही सासरच्यांनी गाडी व संसारोपयोगी साहित्य दिलं. त्याने ते घेण्यास नकार दिला. लग्नानंतर काही दिवस चांगला संसार झाला; पण आता पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी असून, तिच्या माहेरच्यांनी दिलेलं संसारोपयोगी साहित्य घेऊनच सासरी येईन, अशी भूमिका तिने घेतली होती.

या प्रकरणानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेकांनी पत्नीच्या माहेरच्यांकडून केवळ एक रुपया घेऊन लग्न करणाऱ्या पतीचं कौतुक केलं आहे. मुलीला हक्काने माहेरची मंडळी संपत्ती देत असतील तर ती घेण्यास हरकत नसल्याचं काही जण म्हणत आहेत.

First published:

Tags: Bhopal News, Madhya pradesh, Wedding