मराठी बातम्या /बातम्या /देश /

हिंदू असल्याचं सांगून प्रेम केलं, मूल झाल्यावर म्हणाला मी ख्रिश्चन; आता तरुणीला म्हणतो...

हिंदू असल्याचं सांगून प्रेम केलं, मूल झाल्यावर म्हणाला मी ख्रिश्चन; आता तरुणीला म्हणतो...

मुलीने एका मुलाला जन्म दिला, तेव्हा त्या तरुणाने सांगितले की तो एक ख्रिश्चन आहे आणि तिलाही त्याच धर्माचे पालन करावे लागेल. एवढेच नाही तर मुलाला येशू ख्रिस्ताच्या सेवेवर सोपवण्याचा दबाव तिच्यावर टाकत होता.

मुलीने एका मुलाला जन्म दिला, तेव्हा त्या तरुणाने सांगितले की तो एक ख्रिश्चन आहे आणि तिलाही त्याच धर्माचे पालन करावे लागेल. एवढेच नाही तर मुलाला येशू ख्रिस्ताच्या सेवेवर सोपवण्याचा दबाव तिच्यावर टाकत होता.

मुलीने एका मुलाला जन्म दिला, तेव्हा त्या तरुणाने सांगितले की तो एक ख्रिश्चन आहे आणि तिलाही त्याच धर्माचे पालन करावे लागेल. एवढेच नाही तर मुलाला येशू ख्रिस्ताच्या सेवेवर सोपवण्याचा दबाव तिच्यावर टाकत होता.

  • Published by:  News18 Desk

भोपाळ, 04 सप्टेंबर : जबरदस्तीने तरुणीला धर्मांतर (Forced conversion case) करायला लावण्याचा प्रयत्न केल्याची एक घटना उघडकीस आली आहे. हिंदू मुलीला ख्रिश्चन तरुणाने फसवून लग्न केले आणि नंतर तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती करत होता. आपण हिंदू असल्याचे सांगून त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर धर्मांतर (Forced conversion) करण्यासाठी मुलीला भाग पाडले जात होते.

हा प्रकार मध्यप्रदेशच्या भोपाळमधील कोहेफिझा भागात घडला आहे. तरुणाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि जेव्हा मुलगी गर्भवती झाली, त्यावेळी तरुणानं स्वतःला हिंदू असल्याचं सांगून आर्य समाज मंदिरात लग्न केलं. जेव्हा या मुलीने एका मुलाला जन्म दिला, तेव्हा त्या तरुणाने सांगितले की तो एक ख्रिश्चन आहे आणि तिलाही त्याच धर्माचे पालन करावे लागेल. एवढेच नाही तर मुलाला येशू ख्रिस्ताच्या सेवेवर सोपवण्याचा दबाव तिच्यावर टाकत होता. मुलीने धर्मांतर करण्यास आणि मुलाला देण्यास नकार दिल्यावर आरोपीने तिला घराबाहेर हाकलून दिले. कोहेफिझा पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या बहिणीविरोधात मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम -2020 च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

कोहेफिझा पोलीस ठाण्याचे एसआय रमेश मिश्रा यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या कॉलनीत राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीची सुमारे वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय सिंहशी मैत्री झाली होती. संजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोघांनी भेटायला सुरुवात केली. या दरम्यान संजयने लग्नाच्या बहाण्याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. दोघेही श्यामला हिल्समध्ये लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले होते.

मुलगी गर्भवती झाल्याने तिनं संजयवर लग्न करण्यासाठी दबाव आणला. स्वतःला हिंदू असल्याचे सांगत संजयने 14 जानेवारी 2021 रोजी आर्य समाज मंदिरात लग्न केले. 19 एप्रिल 2021 रोजी मुलीने जेपी हॉस्पिटलमध्ये एका मुलाला जन्म दिला. याबाबत माहिती मिळताच संजय त्याची बहीण सोनलसह रुग्णालयात पोहोचला. त्याने मुलीला सांगितले की तो हिंदू नसून ख्रिश्चन धर्माचा अनुयायी आहे. त्याचे खरे नाव संजय मसीह आहे.

हे वाचा - भारताच्या शेजारी देशात परिस्थिती बिकट, Food Emergency ची घोषणा; दुकानांबाहेर लांबच लांब रांगा

संजयने मुलीला सांगितले की तुलाही ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल. मी मुलाला येशूच्या सेवेत ठेवेन. तो येशूच्या मार्गाचा अवलंब करेल. हे ऐकून मुलीला धक्काच बसला. तिने धर्मांतर करण्यास थेट नकार दिला. यावर संजयने मुलीला घरातून हकलून दिले. संजय मसीह हा एका कार शोरूममध्ये काम करतो.

सोनलने भावाच्या कारस्थानाला पाठिंबा दिला

त्याची बहीण सोनलही संजयला पाठिंबा देत असल्याचे तपासात उघड झाले. सोनल मुलीवर तिचा धर्म बदलण्यासाठी दबाव आणत होती. तिनं धर्मांतर न केल्यास घरी न येण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपींच्या ठिकाणांवर छापा टाकला, पण त्यांचा शोध लागला नाही. ही घटना उघडकीस आल्यापासून बहिण आणि तो दोघेही फरार आहेत.

नातेवाईकांनी कळू दिलं नाही

संजयने लग्नासाठी सर्व नातेवाईकांना बोलावले होते. सर्व ख्रिश्चन समाजाचे नातेवाईक होते. मुलीचे म्हणणे आहे की, लग्नाच्या वेळीही संजय ख्रिश्चन असल्याचे कोणत्याही नातेवाईकाने तिला सांगितले नव्हते.

First published:

Tags: Bhopal News, Hindu