मराठी बातम्या /बातम्या /देश /डॉक्टरांच्या तपासणीत गर्भात दिसली जुळी मुलं; मात्र प्रसुतीनंतर कुटुंब हादरलं!

डॉक्टरांच्या तपासणीत गर्भात दिसली जुळी मुलं; मात्र प्रसुतीनंतर कुटुंब हादरलं!

घरात नवीन पाहुणा येणार असल्याने आनंदाचं वातावरण होतं, मात्र ते फार काळ टिकलं नाही.

घरात नवीन पाहुणा येणार असल्याने आनंदाचं वातावरण होतं, मात्र ते फार काळ टिकलं नाही.

घरात नवीन पाहुणा येणार असल्याने आनंदाचं वातावरण होतं, मात्र ते फार काळ टिकलं नाही.

बलरामपूर, 7 फेब्रुवारी : महिलेचं गर्भारपण (pregnancy) , प्रसूती (delivery) आणि बाळाचा जन्म (child birth) या तशा पाहता अतिशय सामान्य आणि नैसर्गिक (natural) घटना. मात्र कधीकधी या प्रक्रियेत शरीराच्या आतच गफलत झाल्याने अनैसर्गिक (unnatural) पद्धतीची बाळं जन्माला येतात. अर्थात अशा घटना खूपच दुर्मिळ असतात. युपीमध्ये अशीच अपवादात्मक घटना घडली आहे.

युपीच्या बलरामपूर जिल्ह्यातील एका नर्सिंग होममध्ये (nursing home) शनिवारी उशीरा संध्याकाळी महिलेनं बाळाला जन्म दिला. तसं पाहता ही सामान्य घटना. मात्र हे बाळ अनैसर्गिक होतं. बघताना दोन शरीरं (two bodies) मात्र एक डोकं (head) अशी या बाळाच्या शरीराची रचना होती.

हे ही वाचा-यूट्यूबवर येण्यासाठी तरुणाची हत्या करुनही पोलिसांची वाट पाहत राहिले 4 आरोपी

रविवारी पहाटे या बाळाचा मृत्यू झाला. जुडवानिया नारायणपूर या गावाचे रहिवासी असलेल्या ओम प्रकाश यांच्या पत्नी संगीता यादव (25) ला प्रसववेदना सुरू झाल्या. तिला खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलचे संचालक डॉ. कारसाज आणि डॉ. रोशन आरा यांनी संगीताचं अल्ट्रासाउंड (ultrasound) केलं. यात बाळाची स्थिती अनैसर्गिक असल्याचं समोर आलं.

डॉ. रोशन आरा यांनी संध्याकाळी सात वाजता महिलेची सामान्य प्रसूती केली. मात्र प्रसूती केल्यावर डॉ. आरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. कारण हे बाळ नैसर्गिक नव्हतं. पाहताना दोन बाळं वाटली तरी त्यांचं डोकं एकच होतं. या बाळाला पाहण्यासाठी लोकांनी हॉस्पिटलमध्ये (hospital) मोठीच गर्दी केली. या गर्दीला आवरताना हॉस्पिटल कर्मचारी अतिशय त्रासून गेले होते. पहाटे चार वाजता या बाळाचा मृत्यू (death) झाला.

First published: