Home /News /national /

Asaam flood : आसाममध्ये महापुराचा हाहाकार 34 पैकी 31 जिल्हे पाण्याखाली, 18 जणांचा मृत्यू तर 7 लाख लोक बाधित

Asaam flood : आसाममध्ये महापुराचा हाहाकार 34 पैकी 31 जिल्हे पाण्याखाली, 18 जणांचा मृत्यू तर 7 लाख लोक बाधित

आसामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. (asaam flood affected area) भूस्खलन (landslide) आणि पुराच्या पाण्याने राज्य मोठ्या संकटात सापडले आहे.

  नवी दिल्ली, 22 मे : ईशान्येकडील एक प्रमुख राज्य म्हणून आसामची (assam) ओळख आहे. सध्या आसामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. (asaam flood affected area) भूस्खलन (landslide) आणि पुराच्या पाण्याने राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. आसाममधील एकूण 34 जिल्ह्यांपैकी 31 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे राज्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सुमारे सात लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.

  पुरामुळे आसाम राज्यातील कित्येक राज्यांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी रस्ते तुटले आहेत तर काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. पुराच्या पाण्याने जिकडे बघाल तिकडे पाणी अशीच अवस्था आसामच्या अनेक राज्यात झाली आहे.  आसामच्या कामपूर शहर तर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. दरम्यान या शहराची वाहतूक थांबल्यामुळे बोटीने लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. हजारो लोक या ठिकाणी असल्याचे चित्र आहे.

  हे ही वाचा : sugarcane farmer : शेतकरी चिंतेत! राज्यात अद्यापही 17.5 लाख ऊस शिल्लक, अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर

  ही स्थिती केवळ कामपूरमध्येच नाही, तर आसामच्या बहुतांश भागात आहे. राज्यातील 31 जिल्हे पुराच्या विळख्यात असून 6 लाख 80 हजारांहून अधिक लोकांना त्याचा फटका बसला आहे. 2200 हून अधिक गावे पाण्याने वेढली आहेत. प्रशासनाने विस्थापितांसाठी 280 हून अधिक मदत छावण्या उभारल्या आहेत, जिथे पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आसाम सरकारने एक दिवस आधी सॅटेलाइट फोनसह नोडल अधिकारी तैनात केले आहेत जेणेकरुन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधता येईल.

  होजाई जिल्हा सर्वाधिक पूर बाधित 

  आसाममधील एकूण 34 जिल्ह्यांपैकी 31 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे, परंतु होजई जिल्ह्यात परिस्थिती सर्वात वाईट आहे. होजाई जिल्ह्यातील बचाव कार्यासाठी सरकारने तीन कोटी रुपयांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय आपत्ती दलाचे (NDRF) जवान दिमा हासाओ या भागात सर्वात जास्त बचाव कार्य करत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पूरग्रस्तांना एयरलिफ्टने हलवावे लागत आहे.

  होफ्लॉन्गमध्ये भुस्खलन

  पुराचे पाणी असेच वाढत राहिल्यास आसामधील काही भागाची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. पुरापासून वाचण्यासाठी अनेक कुटुंबे आपली घरे सोडून इतर ठिकाणी जात आहेत. दरम्यान काही पूर बाधितांनी सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचेही सांगितले. हाफलाँग या भागात भुस्खलन झाल्याने तेथील परिस्थितीही भयावह आहे. जमीन खचल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भिंतींना भेगा पडल्याचे नागरिक सांगत आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Assam, Rain flood

  पुढील बातम्या