रुग्णवाहिका पाठवण्यास दिला नकार, चादरीत गुंडाळून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात

रुग्णवाहिका पाठवण्यास दिला नकार, चादरीत गुंडाळून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम जिल्ह्यात भारतातल्या आरोग्य सेवेची पोल खोलणारा एक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

आंध्र प्रदेश, 10 जून : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम जिल्ह्यात भारतातल्या आरोग्य सेवेची पोल खोलणारा एक प्रकार समोर आला आहे. विशाखापट्टनमच्या कोटाउरतला गावात एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे तिला चादरीत रुग्णालयात नेण्याची वेळ आली.

गर्भवती महिलेला शुक्रवारी प्रसुती कळा सुरू झाल्या. तिला रुग्णालयात नेण्यासाठी 108 हा रुग्णवाहिकेच्या नंबरवर कॉल केला असता, रुग्णवाहिका पाठवण्यासाठी रस्ते खुप खराब आहेत असं कारण देत रुग्णवाहिका पाठवण्यास नकार देण्यात आला.

गर्भवती महिलेच्या घरापासून रुग्णालय हे 10 किलोमीटर लांब अंतरावर आहे. रुग्णवाहिकेस नकार दिल्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी तिला चादरीत गुंडाळलं आणि रुग्णालयात नेलं.

त्यांनी गर्भवती महिलेला चादरीत ठेवलं. 4 जणांनी चादरीचे 4 कोने पकडले आणि 6 किलोमीटरचा प्रवास पक्का केला. सुदैवाने पुढचा 4 किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी त्यांना ऑटो रिक्षा मिळाली.

या सगळ्या प्रकारावर विधायक आणि तेलगू देसम पार्टीच्या नेत्या अनीता यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण दरम्यान, भारतात आरोग्य सेवेचे कसे तीन-तेरा वाजले आहेत हे पुन्हा एकादा अधोरेखित झालं आहे. या प्रकारावर लाज वाटून तरी सरकार नागरिकांच्या हिताचा आणि आरोग्याचा विचार करणार आहे का, हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे.

 

 

हेही वाचा...

VIDEO : पुरंदरमध्ये वादळ आलं, तलावातलं पाणी ढगात नेलं

नको ते धाडस!, पूल पार करताना 'तो' गेला वाहून

सलग तीन दिवस ड्युटी करुन घरी परतणाऱ्या एसटी चालकाचा मृत्यू

पत्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत जमीनदोस्त

नवी मुंबईत घरात शिरलं पाणी

First published: June 10, 2018, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading