चित्तूर, 21 जानेवारी : अनेकदा प्रेमाच्या नावावर टोकाचा हिंसकपणा झालेला दिसून येतो. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) चित्तूर जिल्ह्यात (Chittoor District) एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका 19 वर्षीय माथेफिरू मुलानं हे भयंकर कृत्य केलं आहे.
चित्तूर जिल्ह्यातील पेनुमारू इथं घडलेली ही घटना आहे. यातल्या आरोपी मुलाचं नाव दिलीप बाबू आहे. मंगळवारी दुपारी त्यानं आपल्या प्रेयसीची (girlfriend) चाकूचे (knife) वार करत हत्या (murder) केली. आपल्या दोस्तांसह अगदी रस्त्यावर त्यानं हे क्रूर कृत्य केलं.
पोलिसांचं (police) म्हणणं आहे, की यात बळी गेलेली गायत्री आणि आरोपी दिलीप बाबू यांचे प्रेम संबंध (love affair) होते. आणि दिलीप डिसेंबरमध्ये आपली प्रेमिका गायत्रीसह फरार झाला होता. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर या दोघांच्या आई-वडिलांनी त्यांना शोधून काढलं. यानंतर पोलिसांच्या सल्ल्यानुसार या दोघांना समजावत आपापल्या घरी पाठवण्यात आलं. या घटनेनंतर, दिलीप बाबूच्या प्रेयसीनं त्याच्यासोबतच संबंध जवळपास तोडले. गायत्री मंगळवारी आपल्या मित्रांसह फिरायला निघाली होती. तेव्हा तिला अचानक दिलीप बाबूनं रस्त्यात (on street) थांबवलं. दोघांमध्ये तिथंच मोठा वाद झाला.
यामुळं भडकलेल्या प्रियकरानं रागारागात आपल्या प्रेयसीवर अनेकदा चाकूचे वार केले. यातून ती गंभीर स्वरूपात जखमी झाली. हे पाहून लगोलग आरोपी दिलीप तिथून फरार झाला. या मुलीला आसपासच्या लोकांनी तातडीनं सीएमसी हॉस्पिटलमध्ये(hospital) पोचवलं. इथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या हत्येमुळं अस्वस्थ झालेल्या गावकऱ्यांनी या मुलाच्या घरावर हल्ला केला. मुलीच्या घरच्यांनीही आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Murder news, Police