मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! Covid पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट इथे करून मिळतो निगेटिव्ह, मोठं रॅकेट उघड

धक्कादायक! Covid पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट इथे करून मिळतो निगेटिव्ह, मोठं रॅकेट उघड

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

कोरोनाच्या काळात (Coronavirus pandemic) अनेक भ्रष्ट लोकांना आयतं कुरण मिळालं आहे. आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा घेत काहीजण भ्रष्ट कारभार करत आहेत.

    धनबाद (झारखंड), 31 डिसेंबर : कोरोनाच्या (corona) काळात आरोग्य व्यवस्थेच्या सक्षम कारभारासह अनेकदा औषधाचा काळाबाजार, भ्रष्ट व्यवस्थेच्या (corruption) बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक घटना झारखंड (Jharkhand) राज्यात घडली आहे. धनबाद इथं एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणी (positive report) आलेल्या रुग्णांना चक्क निगेटिव्ह (negative) असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात आहे. या मोठ्या षडयंत्राचा सुगावा आज लागला. समोर आलेल्या माहितीनुसार, पॅथकाईंड लॅब (pathkind lab) ही चाचण्यांणीसाठी नेमलेली एजन्सी आणि तिच्या शाखा हा भ्रष्ट कारभार करत होत्या. या पॅथकाईंड लॅबनं अयोग्य पद्धतीनं रुग्णांची नोंद केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सोबतच पॉझिटिव्ह आलेली चाचणी निगेटिव्ह करवून दिली जायची. प्रशासनानं केलेल्या तपासणीत उघड झालं आहे, की या सगळ्यात पॅथकाईंड लॅबमध्ये काम करणारा विकास नावाचा कर्मचारी सहभागी होता. हा विकास 400 रुपयात कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह बनवून द्यायचा. याबाबत तक्रार मिळाल्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डीसी उमाशंकर सिंग यांनी वरिष्ठ अधिकारी श्याम नारायण राम यांच्या नेतृत्वात  5 सदस्यीय तपास समिती नेमली होती. या तपास समितीनं सगळ्या प्रकरणाची तपासणी करत डीसी सिंह यांना अहवाल दिला. या अहवालात सांगितलं गेलं, की पॅथकाईंड लॅबचा कर्मचारी विकास आणि अजून एक गौतम कुमार नावाची व्यक्ती हे रॅकेट चालवत होती. सिंह यांनी या दोघांविरूद्ध एफआयआर दाखल करत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. यानंतर डीसी सिंह यांनी पॅथकाईंड लॅबच्या वरिष्ठ विक्री अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस दिली आहे आणि २४ तासांमध्ये स्पष्टीकरण मागितलं आहे. पॅथकाईंड लॅबच्या सर्व शाखांची एनओसी रद्द करत सुरक्षा रक्कमही जप्त करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अशी केली जाते एंट्री तपास समितीनं आपल्या अहवालात सांगितलं आहे, की प्रत्येक सॅम्पलची नोंद आरटी-पीसीआर ऍपच्या माध्यमातून केली जाते. रुग्णाची सविस्तर माहिती यात भरली जाते. त्या रुग्णाचा एसआरएफ क्रमांक जनरेट झाल्यावर सीएमएस पोर्टलमध्ये अपडेट केल्या जातो. यानंतर पोर्टलच्या माध्यमातून रिजल्ट डाउनलोड केला जातो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या