News18 Lokmat

'निवडणुकांआधी भारत पुन्हा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणार'

नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकांच्या आधी पुन्हा एअर स्ट्राईक करतील असा अंदाज आणि भीतीही इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 09:23 AM IST

'निवडणुकांआधी भारत पुन्हा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणार'

नवी दिल्ली, 27 मार्च : भारतीय वायुसेनेनं 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता. त्याची धास्ती अद्यापही पाकिस्तानला आहे. याच दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावर भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यातून त्यांनी आणखी एका हवाई हल्ल्याची भीती असल्याचं स्पष्ट होतं.

पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे की, भारतामध्ये लोकसभा निवडणुका पूर्ण होण्याआधी भारत-पाकिस्तानमधले संबंध तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. भारताकडून पाकिस्तानवर आणखी एक एअर-स्ट्राईक होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्ध होण्याची शक्यता असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. कारण नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकांच्या आधी पुन्हा एअर स्ट्राईक करतील असा अंदाज आणि भीतीही इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने इम्रान खान यांच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानवरचा धोका अद्याप संपला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत तणावाची परिस्थिती कायम राहील. आम्ही भारतापासून कोणत्याही प्रकारचा हल्ला थांबविण्यासाठी आधीच तयार आहोत. "

PM मोदींनी पाकिस्तानला दिल्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा, इम्रान खान यांचा दावा

Loading...

पाकिस्तानात 23 मार्चला राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. त्याच्या अगोदर एक दिवस शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला होता की, त्यांना भारताचे पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान खांन यांनी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवसानिमित्त मोदींचा मेसेज आल्याचा दावा केला होता.

इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यानुसार मोदींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते की, मी राष्ट्रीय दिवसाच्या पाकिस्तानला शुभेच्छा देतो. उपखंडातील लोकांनी दहशतवाद आणि भीतीपासून मुक्त होऊन लोकशाही आणि शांततेने प्रगतीसाठी काम करण्याची ही वेळ आहे.

...अन्यथा परिणाम गंभीर होतील; अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं आहे. शिवाय, भारतावर आणखी एक जरी दहशतवादी हल्ला झाला तर त्याचे परिणाम हे गंभीर होतील असा इशारा देखील यावेळी अमेरिकेनं पाकिस्तानला दिला. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला सरळ इशारा दिला. यावेळी बोलताना, पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होऊ नये म्हणून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोएबावर कठोर कारवाई करावी असं मत अमेरिकेनं व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढले आहेत. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता.


VIDEO: 'मी सुद्धा बारामतीची लेक आणि दौंडची सून'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2019 09:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...