भारतामुळे उडालीय इम्रान खान यांची झोप; संसदीय कमिटीच्या बैठकीत दिली कबुली

भारतामुळे उडालीय इम्रान खान यांची झोप; संसदीय कमिटीच्या बैठकीत दिली कबुली

भारतानं केलेली कारवाई पाहिल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांची झोप उडाली आहे. त्याबद्दलची कबुली त्यांनी संसदीय कमिटीच्या बैठकीमध्ये दिली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 7 मार्च : भारतानं एअर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्ताननं भारताचा धसका घेतला आहे. यामुळे आता इम्नान खान यांची झोप देखील उडून गेली आहे. तेहरीक ए इन्साफच्या संसदीय कमिटीच्या बैठकीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी त्याबद्दलची कबुली दिली आहे. 'वेळेवर निर्णय घेतला गेल्यानं भारत - पाकिस्तान युद्ध टळलं. पण, अद्याप धोका मात्र कायम आहे'. असं इम्नान खान या बैठकीमध्ये म्हणाले.

पुलावामा येथे 14 फेब्रुवारी रोजी जैश  ए मोहम्मदनं आत्मघातकी हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलत पाक व्याप्त काश्मीर घुसून एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये जवळपास 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी देखील भारताच्या हद्दीत घुसत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतानं त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी पाकिस्ताननं ताब्यात घेतलेले विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत सोडून दिलं.

सध्या दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणाव काहीसा निवळला असला तरी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरूच आहेत. शिवाय, दहशतवादी कारवाया देखील वाढल्या आहेत.

'रोजगार गायब, 15 लाख गायब आणि आता राफेल फाईलदेखील गायब'

पाकिस्तान पोसतोय दहशतवाद्यांना

दहशतवादाला आम्ही पोसत नाही असा दावा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी त्याबाबतची धक्कादायक अशी कबुली दिली आहे. 'माझ्या काळात पाकिस्ताननं भारताविरोधात 'जैश ए मोहम्मद'चा वापर केल्याची कबुली मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे पत्रकार नदीम मलिक यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. बुधवारी पाकिस्तानातील 'हम न्यूज' या वृत्तवाहिनीशी मुशर्रफ बोलत होते. शिवाय, पाकिस्ताननं 'जैश ए मोहम्मद' विरोधात केलेल्या कारवाईचं देखील मुशर्रफ यांनी स्वागत केलं आहे. यावेळी बोलताना परवेज मुशर्रफ यांनी जैशनं डिसेंबर 2003मध्ये दोन वेळा माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याची देखील माहिती दिली.

मसूद अझहरची ऑडिओ क्लिप जारी, काय म्हणाला ते वाचा

मसूदचा मुलगा,भावासह 44 दहशतवाद्यांना अटक

दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा मुलगा हम्माद आणि भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह बंदी घातलेल्या संघटनांच्या 44 दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील तपास यंत्रणांनी मंगळवारी (5 मार्च) अटक केली. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला हे पाऊल उचलावं लागलं आहे. यासंदर्भात पाकिस्तानचे गृहसचिव आझम सुलेमान खान यांनी म्हटलं की, पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या ज्या दहशतवाद्यांची नावे भारताने दिली होती, त्यामध्ये हम्माद आणि रौफचं नाव होते. भारताने ज्या दहशतवाद्यांचा उल्लेख केला होता, केवळ त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली, असा अर्थ कोणीही काढू नये. त्या व्यतिरिक्तही अन्य संघटनांच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

भाजप खासदार आणि आमदार यांच्यातील तुफान हाणामारीचा VIDEO

First published: March 7, 2019, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading