'काश्मीर पाकिस्तानच्या हृदयात आहे तेवढं आमच्याही' या नेत्याचा इम्रान खान यांना पाठिंबा

'काश्मीर पाकिस्तानच्या हृदयात आहे तेवढं आमच्याही' या नेत्याचा इम्रान खान यांना पाठिंबा

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तैयब एर्देगन यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त सत्रात एर्देगन यांनी पाकिस्तानच्या सूरात सूर मिसळले.

  • Share this:

इस्लामाबाद, 14 फेब्रुवारी : तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तैयब एर्दोगन यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर (Kashmir Issue)पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त सत्रात तैयब एर्दोगन यांनी पाकिस्तानच्या सूरात सूर मिसळले.आमचे काश्मिरी बांधव अनेक दशकांपासून हालअपेष्टा सहन करत आहेत, असं ते म्हणाले. भारताचं नाव न घेता ते म्हणाले, एखाद्या देशाने नुकतीच एकतर्फी पावलं उचलल्याने त्यांच्या समस्यांमध्ये भर पडलीय. काश्मीरचा मुद्दा संघर्षाने किंवा दडपशाहीने सुटू शकत नाही. हा प्रश्न न्यायाने आणि पारदर्शक पद्धतीनेच सुटू शकतो, अशा शेराही त्यांनी मारला.

'तुर्कस्तान आवाज उठवत राहील'

एर्दोगन म्हणाले, तुर्कस्तानच्या कॅनाकलेमध्ये 100 वर्षांपूर्वी जे झालं त्याची काश्मीरमध्ये पुनरावृत्ती होतेय. तुर्कस्तान याविरुद्ध आवाज उठवत राहील. पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांची मैत्री समान हितावर नाही तर प्रेमावर आधारित आहे. आज काश्मीरचा मुद्दा जेवढा तुमच्या हृदयात आहे तेवढाच आमच्याही आहे, असंही त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही तुर्कस्तानने काश्मीरच्या मुद्द्यावर हीच भूमिका मांडली होती.

(हेही वाचा : उदयनराजे पुन्हा खासदार होणार का? अमित शहांच्या घरी बैठक सुरू)

आम्ही पाकिस्तानच्या बाजूने ठामपणे उभे आहोत, असं एर्देगन यांनी वारंवार सांगितलं आहे. तुमचं दु:ख मी समजू शकतो. आपली मैत्री प्रेम आणि सन्मानावर आधारित आहे. पाकिस्तानच्या प्रगतीसाठी तुर्कस्तान सर्व ते सहकार्य करेल,असंही एर्देगन म्हणाले.

=======================================================================================

First published: February 14, 2020, 9:20 PM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या