S M L

पुन्हा हल्ल्याचा कट, कोलंबोतल्या विमानतळावर सापडले बॉम्ब

श्रीलंकेत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा रक्तपात घडवण्याचा प्रयत्न केला.

Updated On: Apr 22, 2019 10:08 AM IST

पुन्हा हल्ल्याचा कट, कोलंबोतल्या विमानतळावर सापडले बॉम्ब

कोलंबो, 22 एप्रिल : श्रीलंकेची राजधानी कोलंबोसहीत देशातील काही ठिकाणी एकूण 8 साखळी बॉम्बस्फोट रविवारी(21 एप्रिल) घडवण्यात आले. यानंतर सोमवारीदेखील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा रक्तपात घडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबोतील विमानतळावर बॉम्ब आढळून आले. माहिती मिळाल्यानंतर तातडीनं ही स्फोटकं निकामी करण्यात आली.

दरम्यान, ईस्टर संडेच्या दिवशी तीन चर्च आणि तीन फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या भीषण बॉम्बस्फोटांमुळे श्रीलंका हादरली. यामध्ये 200 हून अधिक निष्पापांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये भारतीयांसह 35 हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर 500हून जास्त जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी नॅशनल तौहिद जमात संघटनेच्या 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पण अद्याप हल्ल्याची जबाबदारी कोणतीही स्वीकारलेली नाही. अ‍ॅन्टोनी चर्च, सेबेस्टियन चर्च, बाट्टिकालोआ चर्च तसंच शांग्री-ला, दी सिनामॉन ग्रँड आणि दी किंग्सबरी या तीन फाइव्ह स्टार हॉटेल्सना टार्गेट करण्यात आलं होतं.

बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती असूनही पोलीस निष्क्रीय; श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा गौप्यस्फोट
दरम्यान,'आत्मघाती हल्ले होऊ शकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पण कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही', असा गौप्यस्फोट श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी केला आहे.विक्रमसिंगे म्हणाले की, 'श्रीलंकेचे पोलीस प्रमुख पुजुथ जयासुंदरा यांनी आठवडापूर्वी सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही'. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...वाचा अन्य बातम्या

रोहित तिवारी हत्या प्रकरणाला नवीन वळण, पत्नी पोलिसांच्या ताब्यात

VIDEO: पालघरमधील उमेदवार बळीराम जाधवांचा शेतीचा अजेंडा काय आहे?

मोदी, पवारांसह दिग्गज मैदानात, कुणाची किती वाजता सभा?

VIDEO : पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी काढला चिमटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2019 08:04 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close