मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 10 लाख कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार!

मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 10 लाख कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार!

केंद्र सरकारचा हा निर्णय अंमलात आला तर एकाच वेळीअस्थायी कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीपेक्षा जास्त वाढणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 12 सप्टेंबर : केंद्र सरकार (Central Government) च्या अंतर्गत येणाऱ्या 10 लाख कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दिवाळीच्या आधी मोठी भेट देण्याची शक्यता आहे. सरकारने हा निर्णय घेतला तर तब्बल 10 लाख अस्थायी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या नव्या नियमांनुसार आता अस्थायी कर्मचाऱ्यांनाही स्थायी कर्मचाऱ्यां एवढाच पगार द्यावा लागणार आहे. (Equal Pay for Equal Work) पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येणारं (PMO) कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालय या योजनेवर काम करत आहे. या निर्णयामुळे सरकारवरही मोठा आर्थिक बोजा पडणार असून त्याचाही हिशेब करण्याचं कामही सुरू आहे. या नव्या नियमांनुसार सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांनी जर 8 तास काम केलं तर त्यांना स्थायी कर्मचाऱ्यांच्या (Pay Scale)  मुळ वेतन आणि महागाई भत्त्यांएवढं वेतन त्यांना द्यावं लागणार आहे.

पाणी मिळाल्याशिवाय 'बाप्पां'चं विसर्जन नाही, शेतकरी बसले उपोषणाला

मात्र त्यांनी नियमित रोजगाराचा अधिकार मिळणार नाही. आत्तापर्यंत या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मान्य केलेलं किमान वेतन मिळत होतं. एका अस्थायी अकुशल कर्मचाऱ्याला  (Unskilled Workers) जर महिन्याला 14 हजार मिळत असतील तर या आदेशानंतर त्याला ग्रुप डी (Group D) च्या स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याला 30 हजार वेतन मिळणार आहे. म्हणजे एकाच वेळी त्याचा दुपटीपेक्षा जास्त पगार वाढणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचं टार्गेट मनसे, 'या' तालुक्यात खिंडार

पण काही कामगार संघटनांनी यावर शंका व्यक्त केलीय. ग्रुप सी आणि ग्रुप डी मधल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती सरकारने कंत्राटी कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे सरकारने आदेश काढले तरी ते त्यांनी लागू करायला पाहिजेत. नाही तर तो फायदा थेट कर्मचाऱ्यांना मिळणारच नाही असंही बोललं जातंय. याबाबत कामगार मंत्रालयानेही आदेश काढला पाहिजे असं मत कामगार संघटनांनी व्यक्त केलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 12, 2019, 9:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading