युतीचं पक्क झाल्यानंतर भाजप लक्ष तामिळनाडूकडे, या आहेत आजच्या मोठ्या बातम्या

युतीचं पक्क झाल्यानंतर भाजप लक्ष तामिळनाडूकडे, या आहेत आजच्या मोठ्या बातम्या

  • Share this:

शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज राज्यभर कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. रायगडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर एनडीएचा घटकपक्ष असलेल्या नारायण राणे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा अजुन पूर्ण झालेली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज आपली भूमीका मांडणार आहेत.

महाराष्ट्रात युतीचं पक्क केल्यानंतर आता तामिळनाडूत भाजप आणि अन्नाद्रमुकची युती होण्याची शक्यता आहे. पीयुष गोयल हे यासाठी चर्चा करत असून अमित शहा सकाळी चेन्नईला जाणार आहेत. आज या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

 

First published: February 19, 2019, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading