शेतकऱ्यांच्या एल्गारापासून धनगर आरक्षणापर्यंत... या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

शेतकऱ्यांच्या एल्गारापासून धनगर आरक्षणापर्यंत... या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

  • Share this:


  • देशभरातले शेतकरी शुक्रवारी संसदेला घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मार्गासाठी देशभरातल्या शेतकरी संघटनांनी हे आंदोलन पुकारलं आहे. गुरूवारीच हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झालेत.

  • विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे गुरूवारीच मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात मंजूर झालं. त्यामुळं सरकारचा आत्मविश्वास वाढलाय. शेवटा दिवशी राहिलेलं सर्व कामकाज पूर्ण करण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.

  • मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतर आता धनगर आरक्षणाची धग वाढतेय. धनगरांना आरक्षण मिळावं यासाठी मनमानमध्ये एल्गार समाजाचा एल्गार मेळावा होणार आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्व संघटना सरसावल्या आहेत.

  • पुण्यातल्या नॅशनल डिफेंस अॅकेडमीत NDA पासिंग आऊट परेड आहे. अतिशय देखणा असा हा कार्यक्रम असतो. करड्या शिस्तित लष्करात दाखल होणारे अधिकारी वर्षभर या परेडची वाट बघत असतात.

  • अर्जेटिनामध्ये शुक्रवारपासून G20 देशांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्यासाठी राजधानी ब्युनस आयरसला पोहोचले आहेत. तिथे ते जगातल्या अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन व्दिपक्षीय संबंधांवर चर्चा करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 11:59 PM IST

ताज्या बातम्या