Home /News /national /

सावधान! जून, जुलै असणार सर्वात जास्त धोकादायक! एम्सच्या संचालकांनी केला मोठा खुलासा

सावधान! जून, जुलै असणार सर्वात जास्त धोकादायक! एम्सच्या संचालकांनी केला मोठा खुलासा

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या 50000 च्या पार गेली आहे. येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 7 मे : देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या 50000 च्या पुढे गेली आहे. 17 मेपर्यंत देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र लगेचच कोरोनाची (Covid -19) रुग्ण संख्या कमी होणार नाही याबाबत वारंवार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जून, जुलै या महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक धोकादायक असेल, असं वक्तव्य एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी केलं आहे. लॉकडाऊन वाढत असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सर्व कामे कधी सुरू होणार याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र येत्या जून, जुलैमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून, जुलै हा कोरोनाचा पीक सिझन असेल असंही डॉ. गुलेरिया यावेळी म्हणाले. मात्र लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. देशात चाचण्या जास्त होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. काही ठराविक भागांमधूनच कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. इतर ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. देशात 80 ते 90000 टेस्ट केल्या जात आहेत. टेस्टच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 ते 4.5 टक्के इतकी आहे. टेस्ट जास्त करीत असल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. आम्ही रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करीत आहोत असे यावेळी ड़ॉ.गुलेरिया यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे. लॉकडाऊनमुळे वेळ मिळाल्याने आम्ही अधिक तयारी केला आहे. जून, जुलैमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता आहे. यासाठी देशात व्हेंटिलेटर आणि आयसीयूमध्ये वाढ केली जात आहे. याशिवाय अधिक डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात आहे. संबंधित -पुण्यात डॉक्टराने परिचारिकांना केली शिवीगाळ,संभाजी ब्रिगेडने केली कारवाईची मागणी
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या